top of page

देवाभाऊ जरा, हिंदूस्थानच्या आजूबाजूला पाहा !- शरद पवार


देवाभाऊ तुम्ही सर्व महाराष्ट्रात तुमचे फोटो लावले. छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेत असल्याचे तुम्ही देशाला दाखवले. मात्र, देवाभाऊ शेतकर्‍यांकडे पहायला तयार नाहीत. देवाभाऊ माझी विनंती आहे की जरा आजूबाजूला पाहा. काय घडतेय? आम्ही सत्तेचा गैरवापर करत नाहीत. पण सरकार शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करत असेल तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही, असा इशारा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज येथे दिला.


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतिने नशिक येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला शरद पवार यांनी संबोधित केले. देवाभाऊ शिवाजी महाराज यांच्या काळात दुष्काळ पडला होता, त्यावेळी त्यांनी सोन्याची नाणी दिली आणि सोन्याचा नांगर शेतकर्‍यांना घेता आला. ते शेती करू शकले. आज शिवाजी महाराज यांचे नाव घेत आहात आणि बळीराजाकडे ढुंकून पाहत नाही. आपल्याला बघ्याची भूमिका घेता येणार नाही. आगामी ठराविक दिवसांत मतद केली नाही तर नाशिकचा हा मोर्चा भविष्यात आणखी उग्र रुप घेईल. देवाभाऊ देशाच्या आजूबाजूला बघा काय घडत आहे. नेपाळमध्ये काय घडत आहे, ते पाहा. तेथील राज्यकर्ते गेले आणि त्या ठिकाणी एक भगिनी आल आणि तिच्या हातात तेथील सत्ता देण्यात आली. आणखी काही मी बोलणार नाही, असा सूचक इशाराही शरद पवार यांनी दिला.

Comments


bottom of page