top of page

देशाच्या भविष्यावर लाठ्या-काठ्यांचा मारा !, संसदवर विद्यार्थ्यांचा मोर्चा, दिल्ली पोलिसांचा आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज, अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या कित्तेक आंदोलनकर्ते जखमी

नवी दिल्ली : ‘कॉक्रोच जनता पार्टी’ च्या वतिने आयोजीत ‘ चलो संसद’ चा नारा देत जंतरमंतरवरुन विद्यार्थी पालकांच्या सहभागात विराट मोर्चा काढण्यात आला. सकाळीच जंतरमंतरवरुन आंदोलकर्त्यांची गर्दी संसदेच्या दिशेने सरकत होती. तत्पुर्वी दिल्ली पोलिसांकडून संसदेकडे जाणारे मार्ग आडवले होते. आंदोलनकर्त्यांनी बॅरिगेट तोडून पुढे सरकरण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षारक्षकांकडून भीषण लाठीचार्ज करण्यात आला. यामध्ये अनेक आंदोलनकर्ते जखमी झाले तर कित्तेकजण बेशुद्ध झाले. दुपारी विराट मोर्चा संसदेच्या दारावर धडकला.

नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह इतर मागण्यांसाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ च्या वतिने आज जंतरमंतरवरुन संसदेवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साधारण 8:00 वाजता जंतरमंतरवरुन संसदेच्या दिशेने मोर्चास सुरुवात झाली. आंदोलनकर्त्यांना आवरण्यासाठी दिल्ली पोलिसांनी संसदेकडे जाणारे मार्ग बॅरिगेट लावून आडवले होते. मात्र, आंदोलनकर्त्यांच्या गर्दीने बॅरिगेट सरकून जंतरमंतरदिशेने धाव घेतली यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी भीषण लाठीचार्ज केला. यामध्ये कित्तेक विद्यार्थी बेशुद्ध झाले, तर अनेक जण जखमी झाले.


जंतरमंतर वरुन निघालेल्या विद्यार्थ्यांच्या या प्रचंड जमावाला पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज केला. दुपारनंतर विद्यार्थ्यांचा प्रचंड मोर्चा संसदेच्या दारापर्यंत पोहचला पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे संसदेच्या बाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले. संसदेबाहेरील पवरिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांनी भीषण लाठीचार्ज केला यामध्ये अनेक आंदोलनकर्ते जखमी झाले. पोलिसांनी अश्रुधुरांचा मारा केला पण विद्यार्थी एक इंचही मागे हटायला तयार नाहीत, शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


दरम्यान, जंतरमंतरवरून संसदेकडे निघालेल्या या भव्या मोर्चावर पालिसांनी भीषण लाठी चार्ज केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या कडक कारवाईत आणि वाढत्या डिहायड्रेशनमुळे अनेक आंदोलक विद्यार्थी जागीच बेशुद्ध पडले. त्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या आंदोलनाला विरोधकांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. आम आदमी पक्षाचे बडे नेते मनीष सिसोदिया, अतिशी आणि काँग्रेसचे कपिल सिब्बल हे स्वत: रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांना पाठिंबा देत होते. मात्र पोलिसांनी त्यांनाही पुढे जाण्यापासून रोखले.


मला मारू नका, थेट गोळीच घाला: नागपूरच्या एका आंदोलकावर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला, यावेळी आंदोलकाने ‘ मला मारु नका, थेट गोळीच घाला’ असा संताप व्यक्त करत पोलिसांच्या कारवाईला जोरदार प्रत्युत्तर दिले. आंदोलकाच्या म्हणण्यानुसार, घटनास्थळी 15 ते 20 पोलीस त्याच्या भोवती जमा झाले होते. त्यामध्ये एक महिला पोलिसाचाही समावेश होता. काही पोलिसांनी अवमानकारक भाषा वापरत लक्ष्य केले आणि त्यानंतर मारहाण केल्याचा आरोप त्याने केला, “ मी कोणताही प्रतिकार केला नाही किंवा हिंसक वर्त केले नाही. तरीही अनेक पोलिसांनी मिळून मला मारहाण केली,” असा दावा त्याने केला.

तीन वेळा आमदार राहिलेल्या प्रतिनिधीला पोलिसांनी तंडगड्याला धरून फेकले: जंतरमंतरवर तैनात असलेल्या दिल्ली पोलिसांनी आंदोलनादरम्यान तीन वेळा आमदार राहिलेले आम आदमी पक्षाचे अखिलेश त्रिपाठी यांना अक्षरश: तंगड्या उचलून थेट बॅरिगेटवरून फेकून दिल्याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे.


नेम प्लेट नसलेले गणवेशातले सैतान कोण? : नेम कार्ड नसलेले सुरक्षा रक्षकांच्या गणवेशातील लोकांनी आंदोलकांच्या गर्दीत घुसून विद्यार्थ्यांसह महिला मुलींना बेदम मारहाण केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यां मुलींनी केला. कित्तेक मुलींना फरपटत नेत त्यांच्यावर लाठी हल्ला करणारे नेमकार्ड नसलेले गणवेशधारी सैतान कोण? असा प्रश्न संतप्त आंदोलक महिलांनी माध्यवांवर संताप व्यक्त करताना केला आहे. शिवाय ज्यांना नेम प्लेट होत्या त्या सुरक्षारक्षकांनी मारहाण केली नाही, मात्र नेमप्लेट नसलेल्या गणवेशधार्‍यांनी गर्दीत घुसून आमचे कपडे फाडण्यात आले, लाठीचार्ज करत आम्हाला बेदम मारहाण केली. जंतरमंतर परिसरातील गुरुद्वाराच्या आवारात आंदोलनकर्त्या महिला- मुलींना फरपटत नेत बेदम मारहान करण्यात आल्याचा आरोपही संताप्त युवतींनी माध्यमांसमोर केला.

Comments


bottom of page