दोन्ही राष्ट्रवादीचं घडण्यापूर्वीच बिनसलं, युती फिस्कटली ?
- Navnath Yewale
- Dec 27, 2025
- 1 min read

पुणे: मागील बर्याच दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी आगामी महापालिका निवडणुका सोबत लढवणार असल्याच्या चर्चा होत्या. शरदचंद्र पवार पक्षाच्या वतिने शुक्रवारी अंकुश काकडे, बापू पठारे, प्रकाश म्हस्के आणि विशाल तांबे यांनी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाच्या पुणे अध्यक्षांची भेट घेतली. मात्र या चर्चेतून काही समोर आलेलं नाही. उलट ही युती फिस्कटली असल्याचं सांगितल जात आहे याला अजित पवारांनी केलेल्या मागणीचं करण दिल आहे.
पुण आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या. यासाठी शुक्रवारी अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. योवळी अजित पवारांकडून एक मागणी करण्यात आली. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की, दोन्हीही राष्ट्रवादीचे उमेदवार हे घड्याळाच्या चिन्हावर लढतील. मात्र हे शरद पवार यांना मान्य नव्हतं. शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांच्या तुतारी या चिन्हावर ठाम आहे. यावरून दोन्हीही पक्षांमध्ये मतभेद झाला आणि अखेर दोन्ही राष्ट्रवादीची युती फिस्कटली असल्याचं सांगितलं जात आहे.
या चर्चेनंतर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांनी देखील अजित पवार यांची भेट घेऊन दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीबाबत चर्चा केली. असं देखील समोर आलं आहे. त्यामुळे जर पुण्यामध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र येणार नसतील तर ठाण्यामध्ये काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
दरम्यान, पुण्यातील शांताई हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची देखील एक तातडीची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवारांची राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेसचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. त्यामुळे एकीकडे अजित पवारांची राष्ट्रवादीशी युती फिस्कटल्यानंतर पवारांनी पुन्हा महाविकास आघाडीकडे युटर्न घेतला आहे का? असे देखील बोलले जात आहे. मात्र महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये नेमकी कशावर चर्चा झाली? याची माहिती समोर आलेली नाही.



Comments