धक्कादायक: बदलापुरात नारी शक्तीला हादरवणारं क्रूर कृत्याचा पर्दाफाश गरजु महिलांना अमिष देवून गर्भाषयांची विक्री; मोठं रॅकेट तीन महिलांना अटक
- Navnath Yewale
- 6 hours ago
- 1 min read

बदलापुर: बदलापुरातील अंडाशय तस्करी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात आंतरराज्यीय रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या अंडाशय तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी सुलक्षणा गाडेकरला पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला बदलापूरमधील गोरगरिब महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे अंडाशय विकण्यास भाग पाडत होती.
या प्रकरणात पोलिसांनी सुलक्षणा गाडेकरसह उल्हासनगरातील तिची साथीदार अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे या 3 महिलांना अटक केली करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासातून एकएक धक्कादायक माहिती उघड होताना दिसत आहे.
प्राप्त माहितीनुसार या प्रकरणात 300 हून अधिक महिला पीडित आहे. या सर्व महिलांना अंडाशयामागे 20 हजार रुपये दिले जात होते. तर मध्यस्थ महिलांना प्रत्येकी 3 हजार रुपये देण्यात येत होते अशी उघड झाली आहे. या अंडाशयांची केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये विक्री केली जात होती. पोलिसांनी मात्र या संपूर्ण तस्करी प्रकरणाबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, या अंडाशय तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेली मुख्य सूत्रधार सुलक्षणा गाडेकर ही बदलापुरातल्या खरवईतील नॅनो सिटीत राहत होती. महिनाभरापूर्वीच ती याठिकाणी राहण्यास आली होती. या नॅनो सिटीतील सी विंगमध्ये 903 क्रमांकाच्या प्लॅटमध्ये ती राहत होती. मात्र काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या नावाची पाटी देखील काढली. पोलिसांनी या महिलेच्या घराची झडती घेतली असता संशयास्पद इंजेक्शन सापडले. पोलिसांनी गाडेकरच्या घरातून गर्भाशयासाठी वापरण्यात येणार्या इंजेक्शन्सचे फोटो, खोटी प्रतिज्ञापत्रं, महिलांचे फोटो आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत.
गर्भाशयात स्त्री बीजाची वाढ होण्यासाठी लागणारे इंजेक्शन्स मुख्य आरोपी सुलक्षणा गाडेकरने आपल्या घरात साठवले होते. ती महिला गरजू महिलांना पैशाचं अमिष दाखवून हे इंजेक्शन्स देत होती. तसंच डॉक्टरांच्या सल्याशिवाय बेकायदेशीरपणे सोनाग्राफी देखील करून घ्यायची. गर्भाशयात स्त्री बिजाची वाढ झाल्यानंतर अशा महिलांना गाडेकर ही आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवायची. तिथं ऑपरेशन थियटरमध्ये नेऊन गर्भाशयातील अंडाशय काढलं जायचे. ज्यानंतर त्याची सर्हासपणे विक्री करण्यात येत होती.



Comments