top of page

धक्कादायक! हिंद महासागरात 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले

ree

म्यानमारहून 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज हिंद महासागरात बुडाल्याची घटना घडली आहे. थायलंड आणि मलेशियाच्या सीमेजवळील हिंद महासागरात हे जहाज उलटले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर 10 प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे. जहाज बुडाल्याची माहिती मिळताच रेस्क्यू टीम मदतीला धावली. या दुर्घटनेनंतर शेकडो प्रवाशी बेपत्ता असल्याची माहिती आहे.


दरम्यान, समुद्रात जहाज नेमकं कोणत्या कारणामुळे बुडाले, याचा शोध घेतला जात आहे. रेस्क्यू टीमने बुडालेल्या शेकडो लोकांचा शोध घेणे सुरू आहे. हे जहाज नेमकं कधी आणि किती वाजता बुडाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मलेशियाच्या अधिकार्‍यांनी सांगितलं की, हे जहाज थायलंडच्या जलक्षेत्रात उलटले. या भागात प्रवाशांना लुटणारे समुद्री चाचे मोठ्या प्रमाणावर आढळतात. एका पोलिस अधिकार्‍याने सांगितले की, ‘ वाचवण्यात आलेल्या लोकांमध्ये रोहिंग्या मुस्लिम नागरिकांचा समावेश आहे. जे प्रामुख्याने म्यानमारमध्ये राहतात. या नागरिकांना गेल्या अनेक दशकांपासून अत्याचाराच सामना करावा लागत आहे.


मलेशिया एजेन्सीचे एडमिरल रोमली मुस्तफा यांनी म्हटलं की, प्राथमिक तपासात समजत आहे की, ‘ हे जहाज रखाइन राज्यातील बुथीदांग शहरातून रवाना झाले होते. हे जहाज तीन दिवसांआधी बुडाले. मलेशियातील एका समुद्र किनार्‍यावर अनेक लोक वाहून आले होते. त्यानंतर बचाव अभियान सुरु करण्यात आलं. म्यानमारमध्ये राहणार्‍या एका महिलेचा मृतदेह देखील वाहून किनार्‍यावर आला होता. आतापर्यंत कमीत कमी 10 लोकांना वाचवण्यात आलं आहे. त्यात एका बंगलादेश आणि म्यानमारच्या लाकांचा समावेश आहे.

Comments


bottom of page