धुळ्यात मोर्चाला हिंसक वळण, पोलिस अधिकार्यावर धारदार शस्त्राने वार
- Navnath Yewale
- 3 days ago
- 1 min read

धुळे: धुळ्याच्या शिरपूरमध्ये आदिवासी संघटनांच्या सुरू असलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले आहे. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या संतप्त मोर्चेकर्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. लाठीचारर्जदरम्यान पोलिस अधिकारी जयपाल हिरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. झालेल्या हल्ल्यामुळे जयपाल हिरे गंभररित्या जखमी झाले असल्याचे म्हटले जात आहे. याच दरम्यान काही पोलिस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत.
शिरपूर येथे 15 ऑगस्ट रोजी 28 वर्षीय नराधमाने आठ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला होता. या घटनेच्या निषेधार्थ हजरोंच्या संख्येने आदिवासी समाज संघटनांनी एकत्र येत शिरपूर तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. हाताला काळ्या फिती बांधून निषेधाचे फलक हातात घेत हा निषेध मोर्चा काढण्यात आला.
या निषेध मोर्चाला शिरपूरचे आमदार काशीराम पावरा देखील हाताला काळ्या फिती बांधून सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. चिमुरडीवर अत्याचार करणार्या नराधमावर कठोरात कठोर शासन करण्यात यावे. त्याचसोबत हा खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा अशी मागणी आंदोलकांतर्फे करण्यात आली आहे.
Comments