नंदुरबारमध्ये आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण
- Navnath Yewale
- Sep 24
- 1 min read
गाड्यांची तोडफोड, जिल्हाधिकारी कार्यालयाचे नुकसान; पोलिसांचा लाठीचार्ज, आंदोलकांकडून दगडफेक

नंदुरबार शहरातील बाजारपेठेच्या परिसरात एका किरकोळ वादातून तरुणावर चाकून सपासप वार करत हत्या केली ही घटना दोन दिवसांपूर्वी घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं नंदुरबार शहरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे आता आदिवासी समाज हा संतप्त झाल्याचं दिसून येत आहे. संबंधित प्रकरणात आरोपीला कडक शिक्षा व्हावी या मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यात हेत्येच्या निषेधार्थ मुक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला हिंसक वळण प्राप्त झालं. आंदोलकांनी काही वाहनांची तोडफोड केल्याचं समोर आलं आहे.

नंदुबार शहराती सिंधी कॉलनी परिसरात भैय्या मराठे नावाच्या एका तरुणाने जय भिल या तरुणावर किरकोळ वादातून चाकूने सपासप वार केले. प्रकृती गंभीर झाल्याने त्याला उपचारार्थ हलवण्यात आले असता त्याचा वाटेतच मृत्यू झाला. तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ आदिवासी समाज आक्रमक झाला असून नंदुरबार शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
आदिवासी युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ आज (दि.24) सप्टेंबर शहरात मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या मूक मोर्चाला हिंसक वळण प्राप्त झालं. मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर गाड्यांची तोडफोड करण्यात आली. बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिस आणि आंदोलकांमध्ये दगडफेक झाली असता पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेनं संतापाची लाट उसळली आहे. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाल्यांच वृत्त आहे. या प्रकरणात एक पोलिस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते देखील जखमी झाले आहेत. मोर्चात आरेापीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात आली होती.



Comments