नवी मुंबईतून अल्पवयीन एकून सहा मुली रहस्यमयरित्या गायब !
- Navnath Yewale
- 15 minutes ago
- 2 min read
काल चार तर आणखी दोन मुली बेपत्ता, तुर्भे, एनआरएल पोलिस ठाणे हद्दीतील घटना

मुंबई: शहरात अल्पवयीन मुली बेेपत्ता होण्याच्या घटनांनी चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. 28 नोव्हेंबर, शुक्रवारी तुर्भे आणि एनआरएल पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चार मुली बेपत्ता झाल्या होत्या. अद्याप त्यांचा शोध लागलेला नसतानाच पुन्हा दोन मुली रहस्यमयरित्या गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीया दंड संहितेच्या कलम 363 (अपहरण) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, तक्रारीमध्ये नमुद माहितीनुसार, आमची 14 वर्षाची मुलगी 27 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1:15 ते 1:50 दरम्यान घराबाहेर गेल्यांनतर परत आलीच नाही. तिचा शोध घेतल्यानंतर ठाव-ठिकाणा न लागल्याने त्यांनी तातडीने तुर्भे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, परिसरातील हालचाली, तसेच मोबाईल लोकेशनच्या आधारावर शोधमोहिम सुरू केली असून अज्ञात इसमाने फूस लावून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दुसर्या घटनेत, 16 वर्षाची मुली सेक्टर-45 सीवुड परिसरातून बेपत्ता झाली आहे. 27 नोव्हेंबर रोजी दुपारी ती घरी एकटी असताना रहस्यमयरित्या गायब झाली तिच्या अंगावार चॉकलेटी टी-शर्ट आणि काळा प्लाझो असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. तिचा मोबाईल नंबर स्विच ऑफ आहे.
दरम्यान, तुर्भे आणि एनआरएल सागरी पोलिस ठाण्याचे अधिकारी आबासाहब पाटील, पोलिस उपनिरिक्षक तुकाराम नागरे व पोलिस निरिक्षक देवेंद्र पोळ, पोलिस उपनिरिक्षक मंगेश कन्नेवाड आदी अधिकार्यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहीम सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. मोबाईल लोकेशन्स पाहिली जात आहेत. संभाव्य संशयितांची चौकशी सुरू आहे. पूर्वीच्या तक्रारींची छाननी केली जात आहे.
आधीच्या चार मुलींचा शोध अद्याप लागू शकलेला नसताना या दोन नवीन घटनांमुळे नवी मुंबईत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकांकडून पोलिसांना सतत माहिती पुरविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, बेपत्ता मुलींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तुर्भे किंवा एनआरएल पोलिस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधवा. मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे. अपरिचित व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. मुलांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करावे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एखादी अल्पवयीन मुली हरली तर त्या विषयात तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करावा या असे आदेश आहेत.



Comments