नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर गुंडांचा हल्ला
- Navnath Yewale
- Sep 20
- 1 min read

त्र्यंबकेश्वर येथे प्रवासी गाड्यांच्या पावत्या फाडणार्या गुंडांनी पत्रकांरावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. गुंडांनी चार पत्रकांरावर हल्ला केल्या असून जखमी पत्रकारांवर शासकिय रुग्नालयात उपचार सुरू आहेत.
त्र्यंबकेश्वर येथे प्रवेश करण्यासाठी काही फी आकारली जाते. ही फी पर्यटकांकडून वसूल केली जाते. या वसूलीसाठी काही मुलं ठेवली आहेत. आम्ही साधू महंताची एक बैठक होती, ती कव्हर करण्यासाठी जात असताना या लोकांनी आमच्या गाड्या आडवल्या आणि आमच्यावर हल्ला केल्याची माहिती पत्रकार योगेश खरे यांनी दिली.
योगेश खरे म्हणले की, आम्ही पत्रकार आहोत आम्ही बैठक कव्हर करायला चाललो आहोत असं सांगितलं. मात्र आमच्या गाड्या बाजूला घ्यायला लावल्या त्यानंतर तुम्ही पत्रकार असो वा कोणीही असो तुमच्या गाड्या सोडणार नाही. इथं यायचं नाही असं सांगितलं. त्यानंतर प्रचंड गोंधळ उडाला आणि आमच्यावर हल्ला करण्यात आला. दगडाने किरण ताजणे यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिथं असलेल्या मुलांनी अजून काही मुलं जमा केली त्यानंतर सर्व पत्रकारांना माहरहाण करण्यात आली.
या हल्ल्यांनतर नाशिकमधील नेते छगन भुजबळ आणि गिरिश महाजन यांनी गंभीर जखमी झालेल्या पत्रकांरांची विचारपूस केली. याबाबत मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष एस.एम. देशमुख यांनी ‘ पत्रकारांवर हल्ला करणार्यांवर पुढं कोणती कारवाई होत नाही. पत्रकारांवर हल्ला होऊ नये म्हणून कायदा केला. पत्रकार संरक्षण कायद्याची त्वरीत अंमलबजावणी करावी’. अशी मागणी केली.
त्याचबरोबर त्यांनी, कायद्याची अमलबजावणी होत नाही म्हटल्यावर हे गुंड मोकाट झाले आहेत. त्यामुळं पत्राकारांवर हल्ले करण्याचं प्रमाण वाढत असल्याचंही ते म्हणाले .



Comments