नाशिकमध्ये भाजपच्या एबीफॉर्मची पळवा-पळवी; कार्यकर्त्यात राडा!
- Navnath Yewale
- Dec 30, 2025
- 2 min read

नाशिक: नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी भाजपचे अधिकृत एबीफॉर्मची पळवा पळवीचा प्रकार घडला. निष्ठावंतांना डावलून आयारामांना उमेदवार्या वाटल्याचा आरोप करत आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे.
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर निवडणुक लढवत आहे. एकून 122 जागांसाठी आज भाजपकडून अधिकृत एबीफॉर्म वाटप करण्यात आले. एबीफॉर्म वाटपासाठी सकाळी भाजप आमदार सिमा हिरे, देवयानी फरांदे, राहुल डकले यांच्यासह मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय निलेश बोरा जिल्हाध्यक्ष यांच्यासह शहराध्यक्ष सुनिल केदार यांच्यासह पदाधिकारी एमआयडीसीमधील कार्यालयात हजर होते. मात्र, येथे इच्छुक कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना चकमा देत नाशिक-मुंबई महामार्गाने अज्ञातस्थळी जाण्यासाठी एकाच वाहनातून प्रवास सुरू केला.
कार्यकर्त्यांनी सिनेस्टाईल त्यांचा पाठलाग करत पदाधिकारी थांबलेले ठिकाण गाठले. यावेळी कार्यकर्त्यांनी बंगल्याचे गेट तोडत आत प्रवेश केल्याने भाजप आमदारांसह पदाधिकार्यांना पुन्हा नाशिकमधील कार्यालयात येवून एबीफॉर्म वाटप करावे लागले. यामध्ये निष्ठावंतांना डावलून ऐनवेळी पक्षात आलेल्या आयारामांसह काही गुंडांना उमेदवार्या वाटल्याच्या आरोपासह उमेदवारीसाठी मोठ्या आर्थिक व्यवहराचांही आरोप आक्रमक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.
या सर्व प्रकारावर मंत्री गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त करत, प्रकरणाच्या चौकशीचे अश्वासन दिले. माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, जे झालं ते चुकीचं झालं आहे. जागांच्या तुलनेत हजारो ईच्छुक होते, सगळ्यांना वाटतं की आपल्याला एबीफॉर्म मिळायला पाहिजे. पण जागा या सगळ्या 122 आहेत आणि मागणारे हाजारो आहेत त्यामुळे हा गोंधळ झाला. आध्यक्ष जर आमचे फॉर्म घेवून निघाले नसते तर अनेकांना फॉर्म देताच आले नसते,राहून गेले असते.
काहींनी त्यांचा पाठलाग केला आणि पुन्हा त्यांना इथं आणलं अशी माहिती आहे. खरं आहे अतिशय चुकीचा प्रकार घडलाय, बीफॉर्म देताना कोणीतरी शंभर, दिडशे लोक येतात आणि गोंधळ घालतात. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. कोण याला खत पाणी घालत होते कोण पदाधिकारी होते याची चौकशी केली जाईल. आठ दिवसापासून नाशिक मध्येच आहे सर्वांशीच बोलनं झालं आहे. या बाबत अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडणार आहे.
एबीफॉर्म पळवापळवीवर महाजन म्हणाले की, एबीफॉर्म सुरक्षीत आहेत. आर्थीक व्यवहरा बाबतचा आरोप फेटाळून लावत तिकीट कापल्या नंतर असे आरोप होत असतात पण त्याची चौकशी केली जाईल. 80 टक्के जून्या व 15 ते 20 टक्के नव्यांना संधी दिली आहे आणि ती द्यावीच लागणार असही मंत्री महाजन म्हणाले.



Comments