top of page

नियमबाह्य शिक्षक भरती प्रकरणात देान्ही शिक्षणाधिर्‍यांचे निलंबन

बीड झेडपीतील तत्कालीन प्राथमिक,माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांवर शासनाच्या प्रधान सचिवांची कारवाई

ree

बीड: बीडच्या जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भगवान फुलारी व तत्कालिन शिक्षणाकिधारी (माध्यमिक) नागनाथ शिंदे यांना बोगस शिक्षक भरती प्रकरण भोवले आहे. या दोघांच्या निलंबनाचे आदेश बुधवारी(ता.19) शासनाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांनी दिले. जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे कार्यरत असताना वादग्रस्तच राहीले. मागच्या काही महिन्यांपूर्वी त्यांची लातूरला बदली झाली. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शिक्षक भरतीचा शासन आदेश नसताना शिक्षक भरती करून अपहार केल्याची तक्रार सादीक इनामदार यांनी केली होती.


दुसरीकडे नागपूरचा शिक्षक भरती घोटाळा प्रकरणही चांगलेच गाजले होते. या प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येत आहे. याच बरोबर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनीही काही शिक्षकांची भरती केली होती. दोघांच्याविरुद्धच्या तक्रारीवरुन विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या समितीमार्फत चौकशी करण्यात आली. समितीने येथील काही संचिका चौकशीसाठी हस्तगत करून नेल्या होत्या. प्राथमिक चौकशीमध्ये भरतीमध्ये अनियमितता झाल्याचे निष्पन्न झाले. ऑक्टोबर महिन्यात समितीने शिक्षण आयुक्तांना आदेश सादर करून नागनाथ शिंदे आणि भगवान फुलारी यांच्या निलंबनाची शिफारस केली. या दोघांनाही प्रधान सचिव रनजितसिंह देओल यांनी निलंबीत करण्याचे आदेश जारी केले आहेत.


दरम्यान, शिक्षक भरती प्रक्रियेतील चौकशीमध्ये नियमबाह्य नियुक्त्या, निकषांचे उल्लंघन आणि पात्रतेचे गैरमूल्यांकन झाल्याचे अढळून आले. त्याचबरोर भरतीची प्रक्रिया योग्य न ठेवणे, नियमांकडे दुर्लक्ष करणे आणि लाभार्थींना अवैधरीत्या नियुक्त्या देण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Comments


bottom of page