निलेश राणेंचा मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी छापा
- Navnath Yewale
- Nov 26
- 1 min read
भाजप निवडणुकीत पैसे वाटत असल्याचा राणेंचा आरोप

सिंधुदुर्ग/कणकवली: कणकवली नगरपरिषदेच्या निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा सुरू आहे. भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप शिवसेना आमदार निलेश राणेंनी केला आहे. मालवणमध्ये त्यांनी भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरावर आज अचानक छापा टाकला. या छाप्यात सापडलेल्या बॅगमध्ये 20 ते 25 लाख रुपये सापडले आहेत.
विजय केनवडेकर यांना हे पैसे कुठून आले याबाबत ठोस उत्तरं देता आली नाही, असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रभावित करण्यासाठी काळा पैसा वापरण्याचा प्रकार सुरू असून, हा त्याचाच पुरावा आहे, असा दावा राणे यांनी केला आहे. आपला मोबाईल कॅमेरा सुरू ठेवत घरातील दृश्ये थेट प्रसारित केली, ज्यामध्ये भाजप पदाधिकार्याच्या घरात पैशाची बॅग आढळून आली आहे.
पोलिसांकडून पंचनामा करून पुढील कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे प्राथमिक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. निवडणुक काळात अशा प्रकारच्या घटनांमुळे वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप भाजप पदाधिकार्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ही बाब राज्या निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणली जाणार असल्याचेही सांगण्यात येत असून, या प्रकरणावर आयोग काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Comments