top of page

निवडणुका घेताच कशाला? ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत तुम्हीच उमेदवार ठरवा- माजी आमदार हितेंद्र ठाकूर

ree


निवडणूक अयोगाला मतदारयादीत घोळ घालून निवडणुका घ्यायच्या असतील तर त्यांनी ग्रामपंचायतीपासून आमदार- खासदार पदाचे उमेदवार जाहीर करावेत, निवडणुकीचा प्रश्न उरणार नाही अशी संतप्त टीका बहुज विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकून यांनी केली. हिजेंद्र ठाकूर यांनी निवडणूक आयोगावर थेट गंभीर आरोप केले आहेत.


काँग्रेसचे नेते लोकसभचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतेच मतदारयादीतील घोळाबाबत आयोगावार टीका केली होती. त्यानंतर सोशल मिडियावर पालघरच्या सुषमा गुप्ता नावाच्या महिलेचे एका मतदार यादीत तब्बल सहा वेळा नाव असल्याचा प्रकार उघड झाला. याच मुद्यावरून ठाकूर यांनीही निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला.


अशा प्रकारे असंख्य घोळ मतदारयादीत आहेत. आम्ही हे प्रकार वेळोवेळी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही असा आरोपही हितेंद्र ठाकून यांनी केला. लोकसभा आणि विधानसभेत अशाच प्रकारे परिवर्तन झालं असल्याचा आरोपही त्यांनी केला. मतदारांच्या घोळावर प्रतिक्रिया देताना हितेंद्र ठाकूर म्हणाले की, “ जर निवडणूक अयोगाकडूनच अशी निष्क्रियता राहणार असेल, तर यापुढे कोणत्याही निवडणुका घेण्याची गरज नाही. थेट ग्रामपंचायतीपासून आमदार- खासदारांपर्यंतचे उमेदवावर आयोगानेच घोषित करावेत. त्यामुळ ग्रामपंचायतचा सदस्य कोण किंवा आमदार कोण हा निवडणुकीचा प्रश्नच राहणार नाही.”


वसई मतदारसंघातून तीन वेळा विजयी झालेले हितेंद्र ठाकूर यांना यंदा पराभवाचा धक्का बसला. भाजपाच्या स्नेहा दुबे- पंडीत यांनी हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला आहे. निवडणुक यादीतील झालेल्या फेरफारीमुळे हा पराभव झाल्याचा सूर हितेंद्र ठाकूर यांनी आवळला आहे.


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी मतदार याद्यांमध्ये घोटाळ्याचा आरोप केला होता. या आरोपांमुळे देशभरात मोठं वादळ निर्माण झालं आहे. काँग्रेसने निवडणूक अयोगाच्या मुख्यालयावर मोर्चाही काढला. मात्र महाराष्ट्रातल्या देान शहरांमधून मतदार यादी घोटाळ्याची प्रकरणं आता समोर येत आहेत. यातलं प्रकरण आहे मुंबई जवळच्या नालासोपार्‍यातलं. दुसरं चंद्रपूरच्या घुग्घुसमधलं तर तिसरं प्रकरण छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण येथील


नालासोपार्‍यातील 39 वर्षीय महिला सुषमा गुप्ता या महिलेचं नाव मतदार यादीत तब्बल सहा वेळा आढळून आलं. महात्वाचं म्हणजे महिलेचा मतदार क्रमांकही वेगवेगळा आहे. सोशल मिडियात या मतदार यादीची माहिती व्हायरल झाली आणि निवडणूक अयोगानं तातडीनं याची दखल घेत माहिती घेण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले. त्याचबरोबर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात विधानसभा निवडणूकीच्या मतदार यादीत हजारो मतदार बोगस असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Recent Posts

See All
स्वबळाचा नारा काँग्रेसचा ! फायदा मात्र भाजपाचा !!

मुंबई महापालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार! असा नारा भाई जगताप यांनी दिला आणि मुंबईचे राजकारण पुन्हा एकदा तापू लागले. मतदार यादीत घोळ झाला असा आरोप करीत भाजपा विरोधकांनी एकजुटीने आक्रमक भूमिका

 
 
 

Comments


bottom of page