top of page

निवडणुका या पारदर्शी आणि मोकळ्या पद्धतीने व्हाव्यात- शरद पवार

ree

पुणे : बिहार निवडणुकीमध्ये महायुतील प्रचंड बहुमत मिळाले. तर विरोधकांचा सुपडासाफ झाला आहे. निवडणुकांच्या निकालाबाबत विविध पातळ्यांवर वेगवेगळे विश्लषण केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील बिहार निवडणुकांच्या निकालाबाबत आपले मत मांडले आहे.


माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, बिहार निवडणुकीच्या मतदानानंतर मी काही लोकांशी बोललो होतो. त्या लोकांकडून मला असं फीडबॅक मिळाला की या निवडणुकीचे मतदान हे महिलांनी हातात घेतले होते. महिलांनी ज्या उत्स्फूर्तपणे मतदान केले त्यामुळे अशी शक्यता आहे की, निवडणुकीपूर्वी जे महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये सरकारतर्फे टाकण्यात आले त्याचा हा परिणाम असू शकातो.


महाराष्ट्रामध्ये देखील अशाच पद्धतीचे निवडणुकांपूर्वी पैशाचे वाटप करण्यात आले होते. अधिकृतपणे मताला पैसे दिले गेले नसले तरी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हे पैसे महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते. बिहारमध्ये देखील अशाच पद्धतीने दहा हजार रुपये महिलांच्या खात्यावर सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात आले हाते. असेही त्यांनी स्पष्ट केले.


सत्तेमध्ये असलेल्या लोकांनी अशा पद्धतीने पैशाने वाटप करून निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका घेतली तर लोकांचा निवडणुक प्रक्रियेवरील विश्वास उडेल अशी परिस्थिती आहे . एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करणे योग्य आहे का? याचा विचार जाणकारांनी करणे आवश्यक आहे. त्यासोबतच निवडणूक आयोगाने देखील याबाबत विचार करणे आवश्यक आहे. निवडणुका या पारदर्शक आणि मोकळ्या पद्धतीने व्हाव्यात याबाबत कोणाचंही दुमत नाही. अशा पद्धतीने पैसे वाटप चुकीचे असल्याची भूमिका शरद पवार यांनी व्यक्त केली.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘ अशा पद्धतीने वाटपाचा परिणाम काय होतो हे मी पूर्वी बारामतीमध्ये बघत होतो. बारामतीचे वैशिष्ट्य होत आज नाही पण 50 वर्षापूर्वी नगरपालिका निवडणुक आली की लोक वाट बघायचे. मतदानाच्या आदल्या दिवशी लोक कशासाठी वाट बघायचे हे सांगायची गरज नाही. वाटप झाल्यानंतर निवडणुकीचे काय निकाल लागतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही. हे लहान प्रमाणात होते मात्र आता संपूर्ण राज्यामध्ये होत आहे. ज्या महिलांचे मतदान 50 टक्के आहे त्यांना दहा-दहा हजार रुपये त्यांना देणे आणि त्यानंतर निवडणुकांना सामोरे जाणे यामुळे निवडणुका पारदर्शक होतात का? याबाबत नक्कीच लोकांच्या मनात शंका आहे, असंही शरद पवार म्हणाले.

Comments


bottom of page