निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजप सत्ता स्थापन करेल! - कुणाल कामरा
- Navnath Yewale
- Nov 14
- 1 min read

बिहार विधानसभा निवडुणुक 2025 च्या महासंग्रामाचा निकाल लागत आहे. सुरुवातील जे कल हाती आले, त्यानुसार एनडीएची वाटचाल आता 206 जागाच्या दिशेने सुरू आल्याचे पाहायला मिळत आहे. तर महागठबंधन अवघ्या 30 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. यानंतर आता विरोधकांकडून एनडीए, भाजपा आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली जात आहे. स्टँड अप कॉमेडियन कुणार कामरा याने निवडणूक आयुक्तांवर निशाणा साधला.
आम आदमी पक्षाचे नेते संयज सिंह यांनीही निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. भाजपाने आता निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे तोंड गोड केले पाहिजे. तीन महिन्यांपूर्वीच म्हणालो होतो की, ही निवडणुक भापाने पळवली आहे. केवळ ज्ञानेश कुमार यांनी विजयाचे प्रमाणपत्र पंतप्रधान मोदींना दिले आहे. 80 लाख मतदार ज्या राज्यातून वगळले आहेत, 5 लाख दुबार मतदार आहेत, त्या राज्यातील निकाला काय असतील? याचा विचार केला पाहिजे, अशी टीका सिंह यांनी केली.
कुणाल कामरा यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत निवडणूक आयुक्तांवर टीका केली आहे.
ज्ञानेश कुमार यांना नेपाळला पाठवा. तिथेही भाजपचे सरकार स्थापन होईल, असे कामरा यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, पराभव झाला आहे हे मान्य केले पाहिजे. त्यात काही दुमत असण्योच कारण नाही. भाजपाने सत्तेचा गैरवापर केला आहे. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करण्यासाठी लावलेला वेळ हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांचे जागावाटप झाले त्यात अर्ज भरण्याचा अखेरच्या दिवशीपर्यंत चालले होते. राहुल गांधींची मतचोरीबाबतची यात्रा होती तिला मिळालेला प्रतिसाद पाहून तेजस्वी यादव यांचा चेहरा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करणे फायद्याचे ठरले असते, असे मत ठाकरे गटाचे नेते आंबादास दानवे यांनी व्यक्त केले.



Comments