top of page

निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला- मुख्यमंत्री फडणवीस

निवडणुका पुढे ढकलल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस संतापले

ree

मुंबई : राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यपदासाठीच्या निवडणुका न्यायालयाच्या कार्यवाहीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अयोगाने पुढे ढकलल्या आहेत. गेल्या पंधरवाड्यापासून ज्या ठिकाणी प्रचार जोरात होता, तिथे निवडणुका अचानक पुढे ढकलल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा उत्साह मंदावला आहे. ज्या भागांतील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत, त्यांचा नवीन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या ठिकाणी मतदान 20 डिसेंबर रोजी होईल आणि मतमोजणी 21 डिसेंबरला पार पडणार आहे. दरम्यान, उर्वरित ठिक़ाणांमध्ये निवडणुका आधी ठरल्याप्रमाणेच 2 डिसेंबर रेाजी नियोजित वेळेनुसार होतील. या संपूर्ण निर्णयावर राज्याचे मुख्यमुंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


देवंद्र फडणवीस म्हणाले, निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. कुठला कायदा निवडणूक आयोग काढतोय ते मला माहित नाही माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाही. या ठिकाणी निवडणुक पुढे ढकलणं अत्यंत चुकीचं आहे. उद्या निवडणुका आहेत आणि आज निवडणुका पुढे ढकलतात हे खूप चुकीचं आहे. अनेक उमेदवारांची प्रचाराची मेहनत वाया गेली निवडणूक आयोग स्वायत्त असलं तरीही अशाप्रकारे निर्णय घेणं चुकीचंच आहे. याबद्दल रिप्रेझंटेशन आम्ही निवडणुका आयोगाला देऊ, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.


राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा आता पुढील टप्पा सुरू झाला असून, काही ठिकाणी सुपूर्ण नगरपालिका/ नगरपंचायतींसाठी तर काही ठिकाणी केवळ प्रभागांसाठीचे मतदान 20 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरला जाहीर केले जातील. ज्या नगरपालिका किंवा नगरपंचायतींमध्ये सदस्यपदासाठी निवडणुक लढवणार्‍या उमेदवारांविरोधात न्यायालयात याचिका दाखल आहे, त्या प्रभागांतील निवडणूक राज्य निवडणूक अयोगाने स्थगित केली आहे. तसेच ज्या ठिकाणी अध्यक्षपदाच्या उमेदवारांविरोधात याचिका दाखल आहे, त्या ठिकाणी संपूर्ण नगरपालिका किंवा नगरपंचायतीची निवडणूक स्थगित करून तिथे आता 20 डिसेंबरला मतदान घेण्याचा निर्णय झाला आहे. आक्षेपांवरील निर्णय देताना झालेला विलंब, अर्ज मागे घेण्यासाठी मिळालेला मर्यादित कालावधी आणि त्याचदरम्यान उमेदवारांना वितरित झालेले चिन्ह यांसारख्या कारणांमुळे राज्य निवडणूक अयोगाने या काही ठिकाणच्या निवडणुका स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या निवडणुका 2 डिसेंबरऐवजी 20 डिसेंबरला पार पडणार आहेत.

Comments


bottom of page