top of page

पंतप्रधान मोदी सायंकाळी 5:00 वाजता राष्ट्राला संबोधित करणार !

ree

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5:00 वाजता देशाला संबोधित करणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. मात्र अद्याप तरी नरेंद्र मोदी कोणत्या विषयावर बोलणार आहेत याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही. मात्र, त्यांनी निवडलेली वेळ महत्वाची आहे.


जीएसटी 2.0 सुधारणांची अंमलबजावणी होण्याची एक दिवस आधी नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत. त्यामुळे पंतप्रधान आपल्या भाषणात जीएसटीच्या बदलांवर बोलण्याची शक्यता आहे. याशिवाय ज्या शक्यता आहेत त्यात एच 1 बी व्हिसा धारकांवर अमेरिकेची कारवाई देखील आहे, ज्यामुळे अमेरिकेत काम करणार्‍या भारतीय तंत्रज्ञांच्या मोठ्या वर्गावर परिणाम होईल. याशिवाय अमेरिकेने लादलेल्या करांवरही बोलण्याची शक्यता आहे.


2014 मध्ये देशाच सर्वोच्च कार्यकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून, पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधित करून अनेक महत्वाचे निणृय जाहिर केले आहेत. 8 नोव्हेंबर 2016 रोजी ज्यांनी राष्ट्राला संबोधित केलं आणि 500,1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली होती. 12 मार्च 2019 रोजी पंतप्रधानांनी 24 मार्च 2020 रोजी राष्ट्राला संबोधित करून कोविड -19 साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तीन आठवड्यांचा देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला होता.


14 एप्रील 2020 रोजी त्यांनी पुन्हा राष्ट्राला संबोधित करून लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. मे महिन्यात त्यांनी राष्ट्राला सांगितले की, सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान राष्ट्राला संबोधित शेवटचं भाषण 12 मे 2025 रोजी झालं होतं, जेव्हा त्यांनी पहलगाममधील दशहवादी हल्ल्यानंतर भारताच्या प्रतिहल्ला ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली.


दरम्यान, पंतप्रधान मोदी संध्याकाळी 5 :00 वाजाता राष्ट्राला संबोधित करणार आहेत. ही घोषणा कालच झाली असून, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हा कार्यक्रम होईल. संबोधनाचे प्रसारण दूरदर्शन, अ‍ॅक्ट यूट्यूब आणि रेडिओवर उपलब्ध असेल. संबोधनाचा नेमका उद्देश अद्याप जाहिर झालेला नाही, पण कायास आहेत की जीएसटी सुधारणांंबाबत बोलील. 22 सप्टेंबरपासून जीएसटी दर कपात (काही वस्तुंवर) लागू होत असल्याने त्याबाबत मोठी घेषणा होऊ शकते. तसेच, अमेरिकेतील एच-1बी व्हिसा शुल्क वाढ आणि ट्रम्प यांच्या टॅरिफवर अप्रत्यक्ष संदर्भ असू शकतो. ज्यात स्वावलंबनावर भर देण्यात येईल.

Comments


bottom of page