top of page

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचं पालन करा- मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर: आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या झळा आजही देशवासीयांना बसत असल्याचं दिसून येत आहेत. राज्यात एकीकडे पेट्रोल आणि डिझलची कमतरता जाणवत असून अद्याप घरगुती गॅससाठी सर्वसामान्यांना रांगेत उभे रहावे लागत आहे. सध्या आखाती देश, अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी करण्यात आली असली तरीही गतकाळातील आणि भाविष्यातील परिस्थितीमुळे देशवासीयांना काही बंधने घालून पुढे जावे लागेल. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासीयांना काही महत्वाची अवाहनं केली आहेत. त्यामध्ये वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल-डिझेलचा वापर काटकसरीने करा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोदींचे आवाहन योग्य असल्याचं म्हटलं आहे.


प्रधानमंत्री नरेेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे, ते योग्य आहे. गरजेप्रमाणे तेल आणि गॅसचा वापर करायला हवा, असे म्हणत मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. आपल्या बाजूच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात किल्लत आहे. पाकिस्तानमध्ये साडेचारशे रुपये प्रति लिटर तेलाचे भाव झाले आहेत. मात्र आपल्या प्रधानमंत्री यांनी कुठल्याही पद्धतीने पुरवठ्यावर परिणाम होऊ दिला नाही. पण. ही अडचण जर आपण समजली नाही आणि याचा उपयोग योग्य प्रमाणात नाही केला, तर आपल्यालाही अडचणीचा सामना करावा लागेल. त्यामुळे, पंतप्रधानांनी जे आवाहन केलंय, त्यावर सर्व देशवासीयांनी अंमलबजावणरी करावी, असे फडणवीस म्हणाले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पेट्रोल, गॅस आणि डिझेलचा वापर कमी केला पाहिजे, शेजारील देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत. पंतप्रधान हैदराबादमध्ये म्हणाले की, आपल्याकडे मोठ्या तेल विहिरी नसल्यामुळे या जागतिक संकटाचा भारतावर अधिक परिणाम होत आहे. ते म्हणाले की, .ज्या शहरांमध्ये मेट्रो आहे, तिथे लोकांनी तिचा वापर करावा. आज अपल्याला बैठकांसाठी व्हिडिओ कॉन्फरंन्सिग आणि वर्क फ्रॉम होमसारख्या उपयांची गरज आहे.


पंतप्रधान मोदींनी केली 9 आवाहने : पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा कारण दर खूप वाढले आहेत, खाद्यतेलाचा वापर मर्यादित जपून करा, पुढील एक वर्षे सोनं खरेदी करू नका, वर्षभर परदेशी प्रवास टाळा, कच्च तेल वाचण्यावर भर द्यायचा आहे, परकीय चलन वाचवण्यावर भर द्यायचा आहे. परकीय चलन साठा आपल्याला कमी होऊ द्यायचा नाही, जास्तीत जास्त मेट्रोने प्रवास करा, इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास करा

Comments


bottom of page