top of page

पक्षप्रवेशाचा घोडेबाजार तेजीत; कल्याण डोंबिवलीत शिवसेना,भजापच्या एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी

ree

कल्याण: निवडणुक आली की तिकीट किंवा उमदवारीसाठी घोडबाजार सुरू होतो. मात्र, कल्याण- डोबिवलीत पक्ष प्रवेशावरुन घोडबाजार तेजीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिंदेसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी पत्रकार परिषदेत भाजप महापौरपदाचे, पैशांचे अमिष दाखवून प्रवेश करवून घेतले जात असल्याचा आरोप केला होता. शिंदेसेनेच्या आरोपांना उत्तर देताना त्याच्या पक्षात जाण्यासाठी 2 ते 5 कोटींची ऑफर दिली जात असल्याचे प्रत्यूत्तर भाजपने कल्याण जिल्हाध्यक्ष नुदू परब यांनी दिले.


महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच दोन्ही पक्षांत विरोधी पक्षासह माजी नगरसेवक,पदाधिकार्‍यांना घेण्यावरून रस्सीखेच सुरू आहे. दर आठवड्याला दोन्ही पक्ष एकमेकांना धक्के देण्यासाठी कंबर कसून आहेत. आता मनसेचे नगरसेवक कोणाच्या गळाला लागतात याची उत्सुकता आहे. दान्ही पक्षांच्या स्थनिक पदाधिकार्‍यांनी एकमेकांवर बुधवारी पत्रकार परिषद घेऊन घोडेबाजार कसा सुरू आहे हे सांगत आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या.


शिंदेसेनेसह भाजपकडून माजी नगरसेवकांवर गळ टाकण्यासाठी वरिष्ठ पातळीवर फोन करणे, प्रत्यक्ष भेट घेणे असे प्रकार याआधी झाले असल्याचे दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, बुधवारी युती धर्म पाळण्यावरून दोन्ही पक्षनेत्यांनी त्यांच्या पदाधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ते आदेश आणखी किती दिवस पाळले जातात हे ही बघावे लागणार आहे.


कोणत्या पक्षात काय मिळणार?

पक्षात येणार्‍यांना काय मिळणार तसेच सध्या वेटिंगवर असलेल्या लोकप्रतिनिधींमध्येही कोणत्या पक्षात गेल्यास काय मिळणार याचीच चर्चा सुरू असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

Comments


bottom of page