top of page

पक्षात या नाहीतर गोळ्या घालू; भाजपकडून थेट धमकी, अभिजीत दिपकेंचे गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहे. राजकारणात दबावाचे वातावरण निर्माण केले जात असून भापमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्यावर सातत्याने दबाव टाकण्यात आला होता. शिवाय कुटुंबीयांना देखील धमक्या दिल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.


अभितीत दिपके म्हणाले की, “ तू भाजपात ये, नाहीतर तुला गोळ्या घालू” अशा प्रकारच्या धमक्या मला देण्यात आल्या. एवढेच नव्हे तर आंदोलन मागे घ्यावे, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असेही वारंवार सांगण्यात आले. मात्र, कोणत्याही परिस्थितीत आपण आपली भूमिका बदलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


दिपके म्हणाले की, मला भाजपमध्ये सामील होण्यासाठी ऑफर देण्यात आली होती. मात्र मी ती स्पष्टपणे नाकारली. “ जर मला भाजपमध्ये जायचेच असते तर मी आतापर्यंत कधीच गेलो असतो.. पण माझा निर्णय ठाम आहे आणि मी कोणत्याही दबावाखाली पक्षात प्रवेश करणार नाही, असंही दिपके म्हणाले.


ही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रेमाची भाषा आहे, असं म्हणत त्यांनी विरोध करणार्‍यांना दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत त्यानी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाना साधला. या सर्व प्रकारामुळे त्यांच्या आई- वडिलांनाही मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.


आपल्या वयाचा उल्लेख करत दीपके म्हणाले की, “ माझे वय सध्या केवळ तीस वर्षे आहे. वयाच्या हिशोबाने पाहिल्यास मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नातवाच्या वयाचा किंवा गृहमंत्री अमित शाह यांच्या नातवाच्या वयाचा असेन” अशा वयाच्या तरुणाला धमक्या देणे हे दुर्दैवी आहे.

bottom of page