पेपरफुटी प्रकरणात पोलिसांच्या ताब्यातील आरोपी भाजपचे सदस्य- संजय राऊत
- Navnath Yewale
- 1 day ago
- 2 min read

देशभरात नीट पेपर लिक प्रकरण गाजत आहे, याच मुद्यावर सीजेपीच्या वतीनं मोठं आंदोलन देखील उभारण्यात आलं आणि या आंदोलनाला मोठं यश देखील आलं. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर महाराष्ट्रात विविध परिक्षा पेपरलीकचं धक्कादायक वास्तव समोर येत आहे. त्यातच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देशातील नीट परीक्षा पेपरफुटीसह महाराष्ट्रातील विविध परीक्षा पेपरफुटीवरून राज्यसभेत सरकारवर निशाना साधत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून देशातील राजकारण चांगलच तापलं आहे.नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी नैतिक जबाबदारी म्हणून तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीच्या वतिने विद्यार्थ्यांनी दिल्लीच्या जंतरमंतरवर 36 दिवस आंदोलन केले. सामाजीक कार्यकर्ते सोनम वांचुक यांनी तब्बल 24 दिवस उपोषण केले. याच मुद्यावरून विरोधकांकडून देखील सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. आज राज्यसभेत बोलताना खासदार संजय राऊत यांनी नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावर बोलताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. पेपर लिक प्रकरणातील सर्व लोक भाजपचे सदस्य आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार राऊत म्हणाले, ‘ आम्हाला तुम्हाला घाबरण्याची ही गोष्ट नाही. मी महाराष्ट्राची गोष्ट सांगतो, पेपर लीक कसा होतो सांगतो. पेपर फुटीप्रकरणी सर्वाधिक लोक महाराष्ट्रातून पकडले गेले आहेत. 8 लोकांना अटक झाली आहे. पेपर लिक प्रकरणातील सर्व लोक भाजपचे सदस्य आहेत. हे मला दुर्दैवाने सांगावे लागत आहे. नीट परीक्षा ही विद्यार्थ्यांचं भविष्य घडवत असते. परंतु ही व्यवस्था सिस्टिम फेल्युअर झाल्याने कोलमडत असेल तर मुलांच्या भविष्यासाठी मोठा धोका आहे.
आमची मुलं उपोषणाला बसले आहेत. तेव्हा तुमची वेळ संपली नाही आणि आता मला वूेळ संपली म्हणून सांगता. नव्या कायद्याने काही होणार नाही. वरूनपासून खालपर्यंत पेपर लीक होत आहेत. तुम्हीर महान लोकांना मोठ्या पदावर बसवता, पण ते न्याय देत नाहीत. तुम्ही व्यवस्थेला बरबाद केलं आहे. ज्या देशात राम मंदिराचं दान चोरी होतं त्या देशात पेपर लिक होतोय यात सर्व आलंय, असा घाघात यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर केला.
नीट पपेरफुटी प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या शिक्षणमंत्री पदावरून पायउतारप व्हावे लागले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीच्या वतिने दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतिने उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष या आंदोलना आपला पाठिंबा जाहीर केला होता. तसेच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जिल्लाष सभेचं आयोजन केले होते.



Comments