पडळकरांची जीभ छाटणार्यांना पाच लाखाचे बक्षीस ! बदलापुरात राष्ट्रवादीची बॅनरबाजी
- Navnath Yewale
- Sep 20
- 2 min read

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवाद काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. त्यानंतर आता शरद पवार गटाकडून राज्यभरात निदर्शने केली जात आहे. अशातच आता गोपिचंद पडळकरांची जीभ कापून देणार्याला पाच लाखाचं बक्षीस देण्यात येईल, अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे.
पडळकरांनी केलेल्या वक्तव्याने राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. त्याविरोधात राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बदलापुरातील झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील कार्यकर्त्यांना पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारले आहेत. तसेच काही कार्यकर्त्यांनी त्यांची प्रतिमा दहन केली. तसेच जयंत पाटील यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेकही करण्यात आला होता.
गोपिचंद पडळकर हे अनेकदा वादग्रस्त विधान करताना दिसतात. त्यामुळे आता कार्यकर्त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. यामुळे आता असे वक्तव्य करू नये. पडळकरांनी असे वक्तव्य केल्याने आता त्यांची जीभ छाटणार्याला पाच लाखांचा इनाम देण्यात येणार असल्याचं बदलापूर राष्ट्रवादीने स्पष्ट केलं आहे.
यापूर्वीही गोपीचंद पडळकर यांनी अनेक अक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. तसेच अनेकदा बेताल वक्तव्य केले होते. त्यांनी देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांवरही खालच्या पातळीवर टीका केली होती. तसेच उद्धव ठाकरेंवरही त्यांनी टीका केली होती. अशातच आता त्यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका करताना केलेल्या भाषेचा राज्यभरात तीव्र रोष निर्माण झाला आहे.
आमदार पडळकरांनी अस वक्तव्य करायला नको होतं - सदाभाऊ खोत
आमदार गोपीचंद पडळकर यांनी राजारामबापु यांच्याबद्दल असं वक्तव्य करायला नको होतं. आपली लढाई राजारामबापु यांच्याबरोबर नाही, तर त्यांच्या वारसांबरोबर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कधीच कोणत्याही भाजप नेत्याला अशा पद्धतीने बोलण्यस सांगितले नसल्याचंही खोत म्हणाले.
पक्षसोडण्यासाठी जयंत पाटलांवर दबाव- खा. संजय राऊत
एकमेकांचा बाप काढण्याची सुरुवात ही नारायण राणे यांच्या मुलाने केली आहे. फडणवीसांनी काही ठराविक माणसं नेमली आहेत. तसेच फडणवीसांनी पडळकरांना आतापर्यंत 12 ते 13 वेळा समज दिली गेली असेल. मात्र जर ते ऐकत नसतील तर याचा अर्थ पडकरांना बोलण्यासाठी फडणवीसांचा पाठिंबा आहे. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच त्यांनी पक्ष सोडावा यासाठी देखील दबाव टाकल्या जात असल्याचे संजय राऊत म्हणाले.


Comments