top of page

परळीतील राष्ट्रवादीच्या नेत्याची मनोज जरांगे, आमदार सुरेश धस यांना धमकी! : धनंजय मुंडेच्या केसाला धक्का लागला, तर खेळ खल्लास..; सोशल मिडियाची पोस्ट व्हायरल

Feb 28
2 min read

बीड: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्यातील वैर उभ्या महाराष्ट्राला नविन नाही. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर शाब्दीक हल्ले चढवले जातात. संतोष देशमुख हत्या प्रकरणापासूनर सुरू झालेले हे वैमानूश्याच्या निखार्‍याला समर्थकांची फुंकर मिळत असल्याचा प्रकार समोर आला आहे.


माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत करण्यात आलेल्या एका फेसबुक पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे. “धनंजय मुंडे यांच्या केसालाही धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास... भंडारा लावून बसलोय ,” अशा आशयाची पोस्ट धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि परळी कृषी उत्पन्न बाजा समितीचे माजी सभापती गोविंद फड यांनी फेसबुुकवर केल्याने राजकीय वर्तुळात तीव्र पतिक्रिया उमटत आहेत. या पोस्टमधून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजपा आमदार सुरेश धस यांना धमकीवजा इशारा देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील राजकारणार आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. विविध आंदोलनादरम्यान नेतेमंडळींवर टीका होत असताना गोविंद फड यांच्या पोस्टने मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर समर्थक आणि विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गोविंद फड यांनी फेसबुक पोस्टमध्ये थेट नावे घेत जरांगे पाटील आणि सुरेश धस यांना उद्देशून भाष्य केल्याने हा प्रकार अधिक गंभीर मानला जात आहे. काही जणांनी या पास्टला खुले आव्हान म्हणून पाहिले आहे असून, राजकीय दबावाखाली अशी भाषा वापरणे चुकीचे असल्याची टीका केली जात आहे. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून फड यांच्या भूमिकेचे समर्थन करण्यात येत आहे.


या वादग्रस्त पोस्टबाबत गोविंद फड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे नेमकी ही पोस्ट कोणत्या पार्श्वभूमीवर करण्यात आली, याबाबत स्पष्टता मिळू शकलेली नाही. या प्रकरणाकडे पोलिस प्रशासनाचे लक्ष आहे.


दुसरीकडे वाल्मिक कराड याच्या मुलाची सुशील कराची एक सोशल मिडियावरची पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये ‘ आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार ’ असं त्याने म्हटलं आहे. या पोस्टमुळे चर्चेला उधाण आलं आहे. सुशील कराड नेमकं काय बोलणार? काही मोठा खुलासा करणार का? असे अनेक प्रश्न या पोस्टमुळे उपस्थित करण्यात येत आहेत. या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


मस्साजोग (जि.बीड) चे सरपंच संताष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आमदर सुरेश धस हे आक्रमक भूमिका घेताना दिसले. त्यांनी थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत गंभीर आरोपही केले होते. त्यानंतर संतोष देशमुख प्रकरणावरुन मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर टीका केली होती. संतोष देशमुख प्रकरणामागचा खरा सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. धनंजय मुंडे वाल्मिक कराडचा पाठीराखा असल्याचंही मनोज जरांगे म्हणाले.

Comments


bottom of page