परांड्यात घरावर गुलाल उधळल्याचा जाब विचारल्याने राडा; 40 जणांच्या टोळक्याकडून दगडफेक, मारहाण वाहनांची तोडफोड
- Navnath Yewale
- Jan 17
- 1 min read

धाराशिव: परांड्यात घरावर गुलाल का उधळला, याचा जाब विचारल्यावरून 40 जणांच्या टोळक्याने एकास मारहाण करत घरांवर आणि वाहनांवर दगडफेक केली. या प्रकरणी परांडा पोलिस ठाण्यात तब्बल 40 जणांविरुद्ध इम्राण गणी कुरेशी (रा. कुर्हाड गल्ली, दर्गा रोड परंडा) यांच्या फिर्यादीवरून दंगल आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 14 जानेवारी 2026 रोजी रात्री. 8:30 वाजण्याच्या सुमारास परंडा शहरातील कुर्हाड गल्ली, दर्गा रोड भागत घडली. फिर्यादी इम्रान कुरेशी यांच्या घरावर गुलाल उधळण्यात आला होता. याबाबत त्यांनी आरोपींना जाब विचारला असता, त्याचा राग मनात धरून आरोपींनी अरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवला.
या जमावाने इम्रान कुरेशी यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करून जखमी केले. इतकेच नव्हे तर आरेापींनी फिर्यादीच्या घरांवर आणि तेथे उभ्या असलेल्या चारचाकी गाड्यांवर दगडफेक करून मोठे नुकसान केले. फिर्यादी इम्रान कुरेशी यांनी 16 जानेवारी 2026 रोजी दिलेल्या तक्रारीवरून खालील 40 जणांविरूद्ध भारतीय न्याय संहिता (इछड) कलम 118(1),125,324 (4),189(2),191(3),190 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात एकाच वेळी एवढ्या मोठ्या जमावावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे पुढील तपास परंडा पोलिस करत आहेत.



Comments