top of page

पराभवानंतर तृणमूल पक्षाला कोर्टाकडून दिलासा; फालटा विधानसभा निवडणुकीने एक आमदार वाढणार!

कलकत्ता: पश्चिम बंगालमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत 15 वर्षापासूनची तृणमूल काँग्रेसची सत्ता उलथवून टाकली. या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला सातत्याने धक्के बसत आहेत. काही नेत्यांनी उघडपणे पक्षांतर्गत राजकारणावर टीकास्त्र सोडले. खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर दाखल झाला. त्यांच्या संपत्तीचीही चौकशी सुरू होणार असल्याची चर्चा आहे. ममता सरकारचे निर्णयही नव्या सरकारकडून बदलले जात असून काही नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत.


बंगालमध्ये नवे सरकार आल्यानंतर टीएमसीला सोमवारी पहिला मोठा दिलासा मिळाला आहे. कलकत्ता कार्टाने तृणमूलचे नेते जहांगीर खान यांच्याविरोधात पोलिसांनी कोणतीही कठोर करावाई करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच त्यांना फालटा विधानसभा मतदारसंघाची निवडणुक लढवण्यासही परवानगी देण्यात आली आहे. मागील महिन्यांत राज्यात झालेल्या


दुसर्‍या टप्प्यातील मतदानावेळी या मतदारसंघात अनेक ठिकाणी हिंसाचार झाला होता. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने या मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलली होती. या मतदारसंघात 29 मे रोजी मतदान होणार आहे. पण त्याआधीच जहांगीर यांच्याविरोधात काही गुन्हे दाखल करण्यता आले होते. या गुन्ह्यांत त्यांच्यावर 26 मे पर्यंत कारवाई न करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

जहांगीर यांनी आपल्याविरोधातील गुन्हे रद्द करण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान कोर्टाने राजकीय परिस्थिती बदलल्याचे कारण देत अंतरिम आदेश दिला. कोर्टाने म्हटले की, हा लोकशाहीचा असलेला देश आहे. राज्यात 4 मे नंरतर राजकीय परिस्थिती बदलली आहे. त्यांच्याविरोधात 4 ते 10 मे दरम्यान अनेक गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.


दरम्यान, फालटा हा मतदारसंघ अत्यंत संवेदनशील मानला जातो. 2011 पासून या मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचा उमेदवार विजयी होत आहे. यावेळी पक्षाने जहांगीर खान यांना मैदानात उतरविले आहे . ते या मंतदारसंघज्ञतील मातब्बर नेजे मानले जातात. मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या अधिक असल्याने खान यांच्याकडून आपला विजय निश्चित असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, भाजपच्या लाटेत त्यांचा निभाव लागणार का, तृणमूलची एक जागा वाढणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Comments


bottom of page