top of page

पुण्यात अखेरच्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं


पुणे : पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 110 तर शरद पवार गटाला 50 आणि 5 जागा इतर पक्षांना देण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गुप्त बैठका आणि गाठिभेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं ठरलं आहे. आता पिंपरी चिंचवड पाठोपाठ पुण्यातही काका- पुतणे एकत्र आले आहेत. चिन्हांबाबत चालू असलेल्या वादावर आज मार्ग तोडगा यशस्वी तोडगा काढण्यात आला आहे. आज अखेरच्या बैठकीत चिन्ह आणि जागावाटप बाबत निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला आहे.


राष्ट्रवादी पक्ष आपआपल्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. घड्याळ आणि तुतारी या दोन्ही चिन्हावर पुणे महापालिका निवडणुक लढवली जाणार आहे. याबाबतची माहिती अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे राज्य प्रवक्ते विकास पासलकर यांनी दिली.


पिंपरी चिंचवडमधील सर्व प्रश्न एकत्रिपणे सोडवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत. अशी घोशणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केली होती. तळवडे येथून प्रचाराचा नारळ फोडताना त्यांनी आगामी निवडणुकीत शहरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट केलं . पिंपरी- चिंचवडनंंतर आता पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत. काल राती उशिरापर्यंत झालेल्या महत्वपूर्ण बैठकीनंतर यावर एकमत झाले आहे. दोन्ही पक्षाकउून जागावाटप करण्यात आलं आहे. मात्र या जागा वाटमध्ये शरद पवार गटानं काहीशी माघार घेतल्याचं दिसत आहे.


पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, दोन्ही चिन्हावर लढणार आहेत. ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे उमेदवार जास्त तिथे ते चिन्ह वापरलं जाणार आहे. उदाहरनार्थ एका प्रभागात अजित पवार गटाचे 3 उमेदवार दोन्ही पक्षाचे आहेत आणि 1 उमेदवार शरद पवार गटाचा असेल तर तेथे 4 ही जणं घड्याळ चिन्हावर लढतील. तर ज्या ठिकाणी 2 उमेदवार दोन्ही पक्षाचे आहेत तिथे दोन्ही चिन्हे वापले जातील.

Comments


bottom of page