पुण्यात राजकीय घडामोडींना वेग: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची आमदारांसोबत बैठक, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर घेणार मोठा निर्णय

पुणे : अजितदादांच्या निधनामुळे पवार कुटुंबासह अख्ख्या महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. अजित पवारांच्या अकाला मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यावेळी प्रसंगावधान बाळगता सुनेत्रा पवार यांनी स्वत: ला दु:खातून सावरत पक्षाची धुरा आपल्याकडे घेतली आणि कामाला लागल्या.
अगदी अजितदादांप्रमाणे त्यांनी कामाचा धडाका लावला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नवनियुक्त सदस्यांच्या बैठक घेतल्यानंतर आता त्या मंगळवारी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेणार आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, या बैठकीत पक्षाची पुढील रणनीती आणि विलीनीकरणावर चर्चा होणार आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एक होणार की नाही याचा निर्णय लागण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. शरद पवार गटाच्या नेत्यांकउून आणि अजित पवार गटातील काही आमदारांनीही विलीनीकरणाची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचदरम्यान पुण्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या आमदरांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत पक्षाची पुढील दिशा, विलिनीकरण, आमदारांच्या समस्या, रखडलेली कामं, प्रस्तावित प्रकल्पांची कामं आणि निधी याविषयी चर्चा होणार आहे.
दरम्यान, बैठकीतील सर्वात महत्वाचा मुद्दा असणार आहे, दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाचा, गेल्या काही दिवसांपासून विलीनीकरणाची चर्चांना उधान आहे त्यामुळे पुण्याच्चा बैठकीत यावर निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेत अजितदादांप्रमाणेच कामाचा सपाटा लावला आहे.
पुण्यासह बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक घेत सुनेत्रा पवारांनी जिल्ह्यात सुरु असणारे प्रकल्प दर्जेदार पद्धतीनं आणि वेळत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांना दिल्या. त्या बीड जिल्ह्याचा देखील दौरा करणार आहेत. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पदीार स्वीकारल्यावर त्या पहिल्यांदाच बीड दौर्यावर जाणार आहेत. येथील महा पशुधन एक्स्पोला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.
विलीनीकरणाचं पहिलं पाऊल : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचं पहिलं पाऊल पुण्यात पडलं आहे. जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार अतुल बेनकेंनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोरच आपण अमोल कोल्हेंसोबत एकत्रित वाटचाल करणार असल्याचं जाहीर केलं. दुसरीकडे तटकरेंनी मात्र याबाबत सावध भूमिका घेतली आहे.
राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसांत निवड होणार : येत्या 15 दिवसांत राष्ट्रवादीच्या नव्या अध्याक्षाची निवड केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आज सकाळपासूनच पुण्यातील सर्किट हाऊस येथे आहेत. येथे त्यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. सर्वानुमते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीच निवड राष्ट्रीय अध्यक्षपदी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे.



Comments