top of page

पुनरीक्षण झाले, तरच याद्या योग्य होतील - मुख्यमंत्री फडणवीस

आम्ही 2026-17 पासून याद्यात घोळ असल्याचे बोलत होतो, मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे आणि मनसेचीच ताकद- रजा ठाकरे


ree

मतदारयादीत जर घोळ आहे, तर त्याच्या पुनरीक्षणाला विरोध का करता? व्यापक पुनरीक्षण हाच यावरील उपाय आहे. गेल्या 25 वर्षात व्यापक सुधारणा न झाल्यामुळे मतदारयाद्यांमध्ये दोष निर्माण झाला आहे. 2021 मध्ये मी स्वत: या दोषांविरोधात उच्च न्यायालयात गेलो होतो. आजही ती याचिका प्रलंबित आहे. मी त्यावेळेस मागणी हीच केली होती की, व्यापक पुनरीक्षण करा. आता निवडणुक अयोगाने व्यापक पुररीक्षण करायला सुरवात केली आहे, तर ते यालाही विरोधत करतात. हे अतिशय चुकीचे आहे. त्याला तुम्ही का विरोध करता. पुनरीक्षण झाले, तरच याद्या योग्य होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.


मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी याबाबत विधान केले होते. विरोधकांनी गेल्या काही दिवसांपासून हा मुद्दा लावून धरला आहे. मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, ते मी 2016-17 पासून बोलत आहेत. हे लोक आता बोलायला लागले आहेत. आमचे लोकांनी तपासायला सुरुवात केली आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकार्‍यांची बैठक घेतली.


यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या देानच पक्षाच्या कार्यकर्त्यांची तळागळात ताकद आहे. या दोन पक्षाव्यतिरिक्त बाकी पक्षांची मुंबईत एवढी ताकद नाही, त्यामुळे कामाला लागा, अशा सुचना राज ठाकरेंनी केल्याचे समजते. राज ठाकरे यांनी केलेल्या या दाव्याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली.



2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत भाजपा सर्वांत मोठा पक्ष होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही मुंबईत भाजपा मोठा पक्षा होता. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील मुंबईत सर्वांत मोठा पक्ष भाजपाच आहे. अर्थात कुणाला स्वत:चा पक्ष मोठा वाटत असेल, तर मला त्याबाबत काही म्हणायचे कारण नाही. आपला पक्ष मोठा आहे, असे म्हणायचा सगळ्यांना अधिकार आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

Comments


bottom of page