top of page

प्रभाग आरक्षणामुळे वरळीत भल्या-भल्यांचा हिरमोड भाजप शिवसेनेच्या वाट्याला येणार प्रत्येकी तीन प्रभाग; उबाठा, मनसेच्या भुमिकने डाव पलटणार?

ree

वरळी: दक्षिण लोकसभा मतदारसंघातील वरळी विधानसभेमध्ये उबाठाचे माजी मंत्री आदित्य ठाकरे हे आमदार असले तरी यंदा या विधानसभेत भाजपचे कमळ फुलवण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. या विधानसभेत भाजपच्या वाट्याला तीन आणि शिवसेनेच्या वाट्याला तीन प्रभाग येण्याची शक्यता आहे तर उबाठाचे चार नगरसेवक असले तरी या विधानसभेत मनसेने ती प्रभागांमध्ये दावेदारी केली आहे. यंदा ठाकरेंची युती झाली असली तरी प्रभाग महिला आरक्षित झाल्याने मनसेच्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात कुणाला उतरवायचा आणि किती प्रभागांमध्ये तडजोड करायची असा प्रश्न असून शेवटच्या क्षणाला मनसे दोन प्रभागांमध्ये समाधान मानण्याची शक्यता आहे.


वरळी विधानसभेमध्ये उबाठाचे चार नगरसेवक आणि शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा समावेश आहे. उबाठाच्या चार नगरसेवकांमध्ये दोन माजी महापौर, एक माजी उपमहापौर आणि माजी बेस्ट समिती अध्यक्षांचा समावे आहे. तर संतोष खरात आणि दत्ता नरवणकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेनेचे दोन माजी नगरसेवक आहेत. या वरळी विधानसभेत भाजपाचा एकही नगरसेवक नसून मागील निवडणुकीत भाजपा तीन पराभूत उमेदवार दुसर्‍या स्थानावर होते. त्यामुळे यंदा शिवसेनेला तीन आणि भाजपला तीन जागा सोडल्या जाण्याची शक्यता असून यावेळी कोणत्याही परिस्थितीत भाजपचा नगरसेवक निवडणून आणण्याचा निर्धार पक्षाने केला आहे.


प्रभाग निहाय स्थिती

प्रभाग क्रमांक 193: हा प्रभाग पुन्हा ओबीसी साठी आरक्षीत झाला आहे. सलग तिसर्‍यांदा ओबीसी झाला आहे. या प्रवर्गातून पुन्हा एकदा माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांचा दावा फिक्स झाला आहे. हा प्रभाग यापूर्वी कायमच अनुसूचित जातीकरता आरक्षित राहत होता. मात्र, आता पुन्हा ओबीसीसाठी आरक्षीत झाल्याने उबाठा विरोधात शिवसेना (शिंदे) असे चित्र या प्रभागात दिसण्याची शक्यता आहे. या प्रभागात भाजपकडे उमेदवार नसलयने हा प्रभाग शिवसेना (शिंदे) गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. याठिकाणी शिवसेनेच्या उपविभाग अध्यक्षा निकिता घडशी यांचे नाव चर्चेत आहे.


प्रभाग क्रमांक 195 : मागील पंचवार्षीकसाठी हा प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षीत होता. यावेळेस हा प्रभाग पुन्हा ओबीसीसाठी राखीव झाला आहे. खुला प्रवर्ग, अनुसूचित जाती आणि आता ओबीसी असा प्रभागाचा तीन वेळेसचा इतिहास राहिला आहे. या प्रभागासाठी शिवसेना (शिंदे) कडून दत्ता नरवणकर, भाजपकडून विजय बांदिवडेकर आणि उबाठाकडून विजय भणगे यांची नावे चर्चेत आहेत.


प्रभाग क्रमांक 196 : हा प्रभाग महिलांसाठी राखीव सुटला आहे. विद्यमान नगरसेवक आशीष चेंबूरकर यांना आता घरी बसावे लागणार आहे. या प्रभागात मुख्य दावेदारी उबाठा शिवसेना असून हा प्रभाग भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. उबाठाच्यावतिने आकर्षिता अभिजित पाटील यांचे नाव चर्चेत आहे. तर भाजपकडून अद्याप इच्छुक उमेदाराचे नाव समोर आलेले नाही.


प्रभाग क्रमांक 197 : हा प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहे. मनसेच्या तिकिटावर निवडून आलेले पण पुढे उबाठा शिवसेनेकडे गेलेल्या दत्ता नरवणकर हे नगरसेवक होते. पण नरवणकर हे सध्या शिवसेना (शिंदे) गटात आहेत. त्यामुळे या प्रभागात शिवसेनेचा दावा आहे. या प्रभागातून शिवसेनेकडून वनिता नरवणकर, अनिता नायर, मनसेच्याचवतिने रचना विकास साळवी, उबाठागटाकडून श्रावणी छोटू देसाई आणि भाजपकडून विमल पवार यांची नावे चर्चेत आहेत. या प्रभागावर मनसेने दावा केला आहे.


प्रभाग क्रमाकं 198 : हा प्रभाग ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. माजी महापौर स्नेहल आंबेकर या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. परंतु या प्रभागात मनसेचे प्राबल्य असल्याने उबाठाऐवजी हा प्रभाग मनसेला सुटण्याची शक्यता आहे. या प्रभागासाठी मनसेकडून अस्मिता येडगे, उबाठाकडून आबोली गोपाळ खाड्ये, भाग्यश्री संदीप वरखडे यांची नावे चर्चेत आहेत.


प्रभाग क्रमांक 119 : हा प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहे पूर्वी ओबीसी महिला आणि त्यानंतर सलग दुसर्‍यांदा महिलांसाठी आरक्षित झाला आहे. उबाठा, भाजपला सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उबाठाकडून विद्यमान नगरसेविका आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अबोली खाड्ये, समृद्धी कोयंडे मनसेच्यावतीने संगीता दळवी आणि शिवसेनेच्यावतीने वंदना साळवी आणि भाजपकडून आरती पुगांवकर यांची नावे चर्चेत आहेत.

Comments


bottom of page