top of page

प्रांजल खेवलकरांच्या अडणीत वाढ !, मंत्री गिरिश महाजनांचा खुलासा


मागील महिन्यात पुण्याच्या खराडीमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता, या प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे, ते सध्या जेलमध्ये आहेत. या प्रकरणात आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.


ree

तीन दिवसांपूर्वी प्रांजल खेवलकर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंध ठेवताना आपला चोरून व्हिडिओ काढल्याची तक्रार एका महिलेनं सायबर पोलिसांकडे केली होती. या तक्रारीवरून प्रांजल खेवलकर यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे खेवलकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान आता या प्रकरणावर पुन्हा एकदा मं़त्री गिरिश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


गिरिष महाजन म्हणाले की, पाच ते सहा जणांचे जे साहित्य जप्त करण्यात आलं होतं, ते व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग पोलिसांनी कोर्टासमोर ठेवल्या आहेत. यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खेवलकरांच्या मोबाईलमध्ये काय-काय आहे? हे पत्रकार परिषदेमधून मांडलं. चौदाशे ते सतराशे व्हिडिओ. ऑडिओ रेकॉर्डिंग प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आहेत, असं महाजन यांनी म्हटलं आहे.


पुढे बोलताना ते म्हणाले की, अनेक तरुणींना अमिष दाखवून त्यांच्यावर अन्याय, अत्याचार करण्यात आला आहे. त्यातील आता कोण तक्रार करणार कोण करणार नाही हे आपण सांगू शकत नाही. आपण सांगितल्याप्रमाणे त्या प्रकरणात एक दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. या रेकॉर्डिंगमध्ये त्या आहेत की नाही? यासंदर्भात पोलिस चौकशी करत आहेत.


एवढ्या मुलींना विवस्त्र करून जर रेकॉर्डिंग करत असेल तर हा कसला भाग म्हणावा? प्रज्वल रेवनाने एक-दोन महिलांना विविस्त्र करून त्यांचे व्हिडिओ काढले त्यांना जन्मठेप झाली. हा कोणता प्रकार आहे? 300 च्या वर मुली याबाबत सांगत आहेत, तशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे. तपास सुरू आहे, तपास झाल्यानंतर जो निर्णय व्हायचा तो होईल.


आज त्या प्रकरणावर टीका टिपणी करणे योग्य नाही. या प्रकरणावर एसआयटी नेमण्याची मागणी करण्यात आली आहे, ती मागणी रुपली ताईंना केली आहे. मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत याबाबतीत ते निर्णय घेतील, योग्य ती चौकशी निपक्षपणे होईल, असं महाजन यांनी म्हटलं आहे.

Recent Posts

See All
बीड पुन्हा हादरलं; सरकारी वकिलाची न्यायालयात गळफास घेवून आत्महत्या

बीड, मस्साजोगचे सरपंच सतोष देशमुख यांच्या हत्ते नंतर बीड कायम चर्चेत राहिलं आहे. आज बीड जिल्ह्यातील वडवणी येथी प्रथमसत्र न्यायालयात एका...

 
 
 

Comments


bottom of page