फक्त भाजपवाले आणि आयटीसेलवालेच भारतीय आहेत का? - अभिजीत दीपके
- Navnath Yewale
- Jun 7
- 2 min read
आंदोलनानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत दिपकेंचा सरकावर हल्लाबोल; छत्रपती संभाजीनगरमधील दाखल होताच आई- वडिल भाऊक

छत्रपती संभाजीनगर: दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके आज रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आई- वडिलांच्या भेटीसाठी दाखल झाले. अभिजीत दिपके यांनी यापूर्वीच सोशल मीडियावरुन धमक्या आल्याचे सांगत आई- वडिलांच्या जिवीत्वाला धोका असल्याची पोस्ट केली होती. दिपके यांचे आई- वडिल नॉटरिचेबल होते. छत्रपती संभाजीनगर, सिडको येथील त्यांच्या राहत्या घरी अभिजीत दीपके यांचे आगमन होता त्यांचे आई-वडिल भाऊक झाले तत्पूर्वी अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषद घेऊन कॉक्रोच जनता पार्टीची भूमिका स्पष्ट करत सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली.

जंतरमंतर येथील आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगर येथील पहिल्याच पत्रकार परिषदेत संवाद साधना अभिजीत दीपके म्हणाले की, या सरकारला देशातला तरुण आता घाबरत नाहीत, जोपर्यंत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तो पर्यंत हे आंदोलन मागे हटणार नाही. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आम्ही घेऊनच राहू आणि येणार्या काळात हे आंदोलन आम्ही आणखी तीव्र करू.
आंदोलनाच्या प्रतिसादावर बोलताना दिपके म्हणाले की मी विमानतळावर गर्दी करूनये असे आवाहन केले होते, तरीही विमानतळावर देशभरातील तरुणांची अलोट गर्दी दिसून आली. मी विमानतळावरुन थेट पोलिस ठाण्यात गेलो होतो, आंदोलनस्थळावर जेवढी जागा होती तेवढी गर्दी होती कुठेही मोकळी जागा नव्हती. यापेक्षा आणखी प्रतिसाद काय हवाय असंही अभिजीत दीपके म्हणाले.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सहा दिवसात राजीनामा नाही दिला तर आम्ही पुन्हा जमीनवर येऊ, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची जबाबदारी पंतप्रधानांची आहे. जर ते रशिया, युक्रेनचं युद्ध थांबवू शकतात, तर पेपर लिक थांबवू शकत नाहीत का.? आगामी काळात कॉक्रोच जनता पार्टी सर्वक्षेत्रातील युवकांचे प्रश्नांना वाचा फोडणार आहे. राजीकय भूमिकेबद्दल बोलताना दीपके म्हणाले की सोशल मीडियावर स्थापन केलेल्या पार्टीला युवकांचा प्रतिसाद पाहता, जवढी राजीकीय पक्ष आहे किंवा सरकार आहे त्यांचकडून युवकांना कसल्याच अपेक्षा राहीलेल्या नाहीत.
टीकारांवर बोलताना अभिजीत दीपके यांनी सीबीएससीचा विद्यार्थी वेदांत या 17 वर्षाच्या मुलाची मार्कशीट चा गैरप्रकार उघड केल्यानंतर त्याला पाकिस्तानी म्हणून संबोधीत केले. एका17 वर्षाच्या मुलाला मीडियाने पाकिस्तानी म्हटलं. या देशात तुम्ही कोणा-कोणाला पाकिस्तानी म्हणणार, त्या वेदांतला पाकिस्तानी म्हणणार तो सीबीएससीचा विद्यार्थी आहे त्याला पाकिस्तानी म्हणता, मला पाकिस्तानी म्हणातात. तुम्ही विरोधकांना पाकिस्तानी म्हणता मग आहे कोण? भारतीय. फक्त भाजपवाले आणि आयटीसेलवाले भारतीय आहेत का? आणि आम्ही सगळे पाकिस्तानी कधी पर्यंत चालणार हे. तुम्ही तुमची जिम्मेदारी निट सांभाळा, तुम्ही तुमची कामं निट करा आम्हाला बोलायची काय गरज पडणार असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचाही समाचार घेत अभिजीत दीपके म्हणाले की, मी संविधान घेऊन गेलो होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घेऊन गेलो होतो. आम्ही तिथे जय भीम ची घोषणा देत होतो. जय भीम चा नरा देणारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना फॉलो करणारे अराजक आहेत का? देवेंद्र फडणवीस हे यूपीचे मुख्यमंत्री नाहीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे असे म्हणत अभिजीत दीपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.



Comments