top of page

फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, ‘या’ मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता, राजकीय वर्तुळात खळबळ

केंद्र सरकाच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेनंतर आता महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्येही मंत्रिमंडळ विस्तार आणि खांदेपालट होण्याची शक्यता आहे. राज्यातील महायुती सरकारमध्ये लवकरच मंत्रिमंडळ विस्तार आणि खांदेपालट होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या आगामी विस्तारात सुमार कामगिरी करणारे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन करणार्‍या काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खराब कामगिरी व वादग्रस्त विधानांमुळे महायुतीतील 2 भाजप, 2 शिवसेना (शिंदे गट) आणि 1 राष्ट्रवादी (अजित पवार गट) अशा एकूण 5 मंत्र्यांचा पत्ता कट होऊन 6 नवीन चेहर्‍यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीमधील शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांतील अकार्यक्षम आणि वादग्रस्त मंत्र्यांची उचलबांगडी केली जाऊ शकते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या नेत्याव सुनेत्रा पवार हे आपापल्या अधिकारात पक्षातील मंत्र्यांबाबत हा मोठा निर्णय धेण्याची शक्यता आहे. यापूर्वी ज्या मंत्र्यांमुळे महायुतीला गालबोट लागले होते, त्यांना वरिष्ठ नेत्यांकडून समज देण्यात आली होती, मात्र आता थेट त्यांचा पत्ता कट करून नव्यसा चेहर्‍यांना संधी दिली जाऊ शकते.


या मंत्रिमंडळ विस्तारात केवळ मंत्रिपद जाण्याचीच भीती नाही, तर काही बड्या मंत्र्यांची खातीही बदलली जाण्याची शक्यता आहे. भाजप आणि अजित पवार गट या दोन्ही पक्षातील काही मंत्र्यांकडील खात्यांमध्ये मोठे फेरबदल केले जाऊ शकतात. शिवसेनेच्या कोट्यातील अकार्यक्षम आणि वादग्रस्त ठरलेल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून थेट बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.


दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पूर्ण झाल्यानंतरच राज्यातील या मोठ्या खांदेपालटाला गती येणार असल्याचे बोलले जात आहे. महायुतीला डाग लावणार्‍या कोणत्या नेत्यांची हकालपट्टी होणार आणि कोणाची खाती बदलणार, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. या संभाव्य विस्तारामुळे सध्या राज्यातील अनेक मंत्र्यांचे धाबे दणाणले आहेत.

Comments


bottom of page