बाळासाहेब ठाकरे जयंती: उद्धव ठाकरेंनी दिली शपथ! ‘मी मेलो तरी बेहत्तर, पण त्या दोन व्यापार्यांचा गुलाम होणार नाही’
- Navnath Yewale
- Jan 24
- 2 min read

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. आजपासून बाळासाहेब ठकारेंच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरवात झाली आहे. या निमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. आजपासून बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरवात झाली आहे.
यानिमित्त अयोजित एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना ठकारे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील नाव न घेता जोरदार निशाणा साधला. बाळासाहेबांनी मराठी माणसांना जगायचंं कसं हे पहिल्यांदा शिकवल, आणि जर जगायचं कसं हेच आपण विसरुन गेलो तर जंस पूर्वी आपण गुलामगिरीमध्ये राहत होतो, तसं या दोन व्यापार्यांचे गुलाम म्हणून जगणं आपल्या नशीबी येईल. मी मेलो तरी बेहत्तर पण त्या दोन व्यापार्यांचा गुलाम म्हणून मी आयुष्य जगणार नाही, तशी शपथ सर्वांनी घेतली पाहिजे, असा घणाघात यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचं नाव न घेता केला आहे.
हे अचानक काही जे चाललं आहे ना, जंगलाच्या जाग्यावर विकास, खाण. जसं खाणीचं कॉन्ट्रॅक्ट निघाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर येतो आणि कुर्हाडीने त्याच्या मुळावर घाव घायलायला लागतो, कारण ते झाड मध्ये येत असतं, जोपर्यंत ते झाड आहे, तोपर्यंत त्यांची खाण नाही होऊ शकत, आणि तो तेव्हा त्या झाडावर घाव घालायला लागतो, तेव्हा त्या झाडावरील पशु पक्षी थरारुन उठतात आता आपलं काय होणार? आपलं काय होणार? मग त्यातील काही पक्षी त्या झाडांशी संवाद करतात, की अरे दादा तुला खूप वाईट वाटत असेल ना? तुला खूप वेदना होत असतील ना? तेव्हा ते झाड म्हणतं यातना होत आहेत. जे घाव बसत आहेत, त्या यातना वगेळ्या आहेत. पण हा जो ठेकेदार आला आहे, तो ज्या कुन्हाडीने माझ्यावर घाव घालत आहे, त्या कुर्हाडीचा दांडा माझ्या लाकडापासून बनला आहे. त्याचं जास्त दु:ख होत आहे. कुर्हाडीचा दांडा गोतास काळ, हे असे सर्व कुर्हाडीचे दांडे हे दोन व्यापारी आपल्याच मुळावर घाव घालण्यासाठी वापरत आहेत. त्याचा आपल्याला राग येतोय, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईची लढाई तुम्ही चांगली लढलात, म्हणजे आज सुद्धा सर्वजण अलर्ट आहात. देशभरातून मला मेसेज येत आहेत, की ही लढाई तुम्ही फार उत्तम पद्धतीने लढलात, एक आभास निर्माण केला गेला होता की आता बस शिवसेना संपली, पण ज्यांनी आभास निर्माण केला त्यांना तुम्ही रोखलं. हे फक्त महाराष्ट्रच करू शकतो. दोन व्यापार्यांकडून आपल्या मुळावरप घाव घालण्याचा प्रयत्न होत आहे, मग तुम्ही हा विचार करा की ठाकरे हे झाड यांना का तोडायचं आहे? तर तापर्यंत तिथे यांची खाण होणार नाहीये.
बाळासाहेबांनी मराठी माणसांना जगायचं कसं हे पहिल्यांदा शिकवलं, आणि जर जगायंच कसं हे आपण विसरून गेलो तर जसं पूर्वी आपण गुलामगिरीमध्ये राहत होतो, तसं या दोन व्यापार्यांचे गुलाम म्हणून जगणं आपल्या नशिबी येईल. मी मेलो तरी बेहत्तर पण त्या दोन व्यापार्यांचे गुलाम म्हणून मी आयुष्य जगणार नाही, याची शपथ सर्वांनी घेतली पाहिजे, किती कराल वार, आम्ही काय लढाईला घाबरणारी माणसं नाही आहोत, अंसही उद्धव ठाकरे यांवेळी म्हणाले.



Comments