top of page

बिहार निवडणुकीच्या बंपर यशानंतर भाजपचा मोठा निर्णय, माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी

ree

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने विक्रमी विजय मिळवला आहे. दुसरीकडे महाआघाडीचा सुपडा साफ झाला आहे. 243 पैकी 200 हून अधिक जागा मिळवण्यात एनडीएला यश आले आहे. मात्र, बिहार निवडणुकीच्या दुसर्‍याच दिवशी भाजपाने मोठी कारवाई करत पक्षातून बड्या नेत्याची हकालपट्टी केली आहे. पक्षाने माजी केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांना सहा वर्षासाठी निलंबीत केले आहे.


माजी केंद्रीय कंत्र्यांवरील ही कारवाई त्यांच्या पक्षविरोधी कारवाया आणि विधानांमुळे करण्यात आली आहे. या कारवाईच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी एनडीएच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि बिहार सरकारवर गंभीर आरोप केले होते.


आर. के. सिहांना नोटीस

बिहारमधील आरा येथील माजी खासदार असलेल्या सिंह यांच्यावर पक्षविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याचा आरोप आहे. भाजपाने सिंह यांना दिलेल्या नोटिसीत म्हटले आहे की, “ तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात. पक्षाने याची गंभीर दखल घेतली आहे. यामुळे पक्षाचे नुकसान झाले आहे, त्यामुळे निर्देशानुसार तुम्हाला पक्षातून निलंबीत करण्यात येत आहे आणि पक्षातून तुमची हकालपट्टी का करू नये, याबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. म्हणून हे पत्र मिळाल्याच्या एका आठवड्याच्या आत तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा.


दरम्यान, सिंह यांनी मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात केंद्रीय गृहसचिव म्हणून काम केले होते. त्यांनी 2013 मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आणि 2014 व 2019 मध्ये ते आरा येथून दोनदा खासदार म्हणून निवडून आले. 2017 मध्ये मोदी मंत्रिमंडळात त्यांची उर्जा मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपली जागा गमावली.


उर्जा प्रकल्प घोटाळ्याचे आरोप: आदानी समुहाशी संबंधित एका ऊर्जा प्रकल्प घोटाळ्याबद्दल सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे अनेक आठवड्यांपासून एनडीएतील तणाव वाढत होता. 2017 ते 2024 दरम्यान केंद्रीय उर्जा मंत्री म्हणून कार्यरत असलेल्या सिंह यांनी बिहार सरकारने 2400 मेगावॉटचा भागलपूर (पिंरपैंती) उर्जा प्रकल्प अदानी पॉवर लिमिटेडला देण्याच्या निर्णयावर सर्वाजनिकरित्या प्रश्नचिन्ह उभे केले होते. हा प्रकल्प 60,000 ते 32,000 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा अरोप त्यांनी केला होता.


सरकारने 6 रुपये प्रति युनिट या वाढीव दराने वीज खरेदी करण्यास सहमती दर्शवली आहे. ज्यामुळे गरीब आणि मध्यवर्गीयांवर बोजा पडेल असा त्यांचा दावा होता. त्यांच्या आरोपांमुळे राजकीय वादळ उठले. काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी सिंह यांच्या दाव्यांचा उल्लेख करत एनडीएवर हल्ला केला केंद्रावर आदानींना ‘ रेड कार्पेट ट्रीटमेंट’ दिल्याचा आरोप केला. भाकप (माले) चे नेते दिपांकर भट्टाचार्य यांनीही नमूद केले की, एका माजी केंद्रीय उर्जा मंत्र्यानेही नितीश कुमार सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.


सिंह यांच्या पक्षावरील सततच्या टीकेमुळे दुरावा अधिक वाढला. त्यांनी मतदारांना, एनडीएने उमेदवारी दिलेल्यांसह गुन्हेगारी नोंदी असलेल्या उमेदवारांना नकार देण्याचे आवाहन केले आणि कोणताही योग्य उमेदवार नसल्यास नोटाला मतदान करण्याचा सल्ला दिला. या महिन्याच्या सुरुवातील, सिंह यांनी त्यांच्या अधिकृत ‘ एक्स हँडलवर कथित 62,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे पोस्ट केली. त्यांनी निवडणूक आयोगावरही टीक केली आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्ट ( आचारसंहिता) लागू करण्यात अयशस्वी झाल्याचा आरोप केला.

Comments


bottom of page