बिहारमध्ये भाजपला बंपर यश; दिल्लीत हालचालींना वेग विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी!
- Navnath Yewale
- Nov 14
- 1 min read

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं दमदार कामगिरी केली आहे. एनडीएकडे 200 पेक्षा अधिक जागांवर आघाडी आहे. बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती होना दिसत आहे. विरोधकांचा दारुण पराभव झाला आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता दिसेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपच्या दोन शिलेदारांनी बिहारमध्ये विरोधकांचा अक्षरश: धुव्वा उडवला आहे.
बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची जोडी सुपरहिट ठरली. मोदींनी त्यांच्या भाषणातून जंगलराजवरून लालू प्रसाद यादव यांच्या राजदला लक्ष्य केलं. केंद्र सरकारच्या योजना आणि राज्य सरकारनं निवडणुक लागण्याआधी पाडलेल्या घोषणांचा पाऊस एनडीएला दणदणीत यश देऊन गेला. भाजपच्या मिशन बिहारमध्ये दोन शिलेदारांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली. भाजपचे रणनीतीकार विनोद तावडे आणि धर्मेंद्र प्रधान बिहार विजयानंतर चर्चेत आहेत.
विनोद तावडे यांचे नांव महाराष्ट्राला परिचीत आहे. 2014 मध्ये राज्यात भाजपचं सरकार आलं. त्यावेळी तावडे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं. मराठा चेहरा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची पार्श्वभूमी, पक्षनिष्ठा यामुळे तावडे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत राहिले. त्यामुळेच 2019 मध्ये त्यांचं तिकीट कापण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात झाली.
पक्षानं तिकीट कापूनही विनोद तावडे यांनी अजिबात खळखळ केली नाही. पक्षानं संघटनेत जबाबदारी दिली. तावडेंनी ती स्वीकारली आणि काम सुरू केलं. एनडीएनं बिहारमध्ये मिळवलेल्या दणदणीत विजयात राष्ट्रीय महासचिव असलेल्या विनोद तावडे यांचा महत्वाचा वाटा आहे. तावडे यांनी उमेदवार निवडीत महत्वाची भूमिका बजावली होती. निवडणूक प्रचाराची रणनीती आखण्यात त्यांचाा मोलाचा वाढा राहिला. लोकगायिका मैथली ठाकूर यांच्या लोकप्रियतेचा होणारा फायदा लक्षात घेऊन तावडे यांनी तिचा भाजप प्रवेश घडवून आणला. दुसर्याच दिवशी तिला अलीनगरमधून तिकीट दिलं. बिहारमधील कामगगिरीचं बक्षीस तावडे यांना लवकरच मिळू शकतं. राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी त्यांचं नाव चर्चेत आहे.



Comments