top of page

बीएमसी निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची लवकरच युतीची घोषणा!

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज्याचे राजकारणात मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. बृहन्मुंबई महापालिकेवर झेंडा फडणकविण्यासाठी महायुतीचा प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने जोरदार तयारी केली आहे. विधानसभेसह राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाचा विजयाचा वारू रोखण्यासाठी ठाकरे बंधूंनी मुंबईत एकनिष्ठ कार्यकर्त्यांची चांगलीच मोठ बांधली आहे. निवडणुकीच्या दृष्टीने युतीची घोषणा कधी करणार? याची उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली आहे. वरळी डोम येथे झालेल्या कार्यक्रमानंतर ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा जोरात सुरू आहे. मात्र अधिकृतरित्या दोन्ही ठाकरे बंधूच्या युतीच्या घोषणा अभावी शिवसैनिक आणि मनसैनिकाला संभ्रमात आहेत. त्यानुसार बीएमसी निवडणुक संदर्भात युतीच्या घोषणेची प्रतीक्षा येत्या काही तासांत संपण्याची चिन्हे आहेत.


दरम्यान, आगामी दोन दिवसांत युतीची अधिकृतरित्या घोषणा होईल अशी शक्यता शिवसेना (उबाठा) आणि मनसेतील दुसर्‍या फळीतील नेत्यांनी व्यक्त केलेली आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि संजय राऊत यांनी तसे अनौपचारिक संकेत दिले आहेत. मनसेतील नेत्यांनी यासंदर्भात अधिकृतरित्या काही बोलत नसले तरी तशी शक्यता व्यक्त केलेली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेऊन युतीचा नारळ फोडतील अशी माहिती मिळत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक दोन्ही ठाकरे बंधूकरिता अस्तित्वाची लढाई समजली जात आहे. कालच नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निकालात भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सरस ठरलेली पाहायला मिळाली. विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमार्फत उमेदवार निश्चितीमध्ये झालेली दिरंगाई पाहता दोन्ही ठाकरे बंधू युतीची घोषणा करून काही उमेदवारांच्या नावांची घोषणा करतील अशी पण शक्यता आहे.


नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणूक निकालांमध्ये भाजप आणि शिवसेनेचे वाढलेले बळ पाहता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूच्या युतीची घोषणा मनसैनिक आणि शिवसैनिकांच्या उत्साहत संचार वाढायला मदत करेल, असं म्हटलं जात आहे.


मनसेच्या युतीबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांची रविवारी बैठक झाली. या बैठकत चर्चा पूर्ण झाली आहे. चर्चा व जागावाटप संपले आहे. कुणी कुठे लढायचे यावर एकमत झाले. कोणतीही अडचण दिसत नाही. येत्या एक-दोन दिवसांत यासंबंधीची रितसर घोषणा होईल, असे ते म्हणाले.

Comments


bottom of page