top of page

बीडमध्ये अल्पवयीन मुलिचे कारमधून अपहरण, डोंगराळ भागात नेवून अत्याचार


बीड: शिकवणीला जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीचे कारमधून अपहरण करून डोगरामध्ये निर्जनस्थळी तिच्यावर अत्याच्यार केल्याची धक्कादायक घटना बीडच्या केज तालुक्यात बुधवारी (दि.7 जानेवारी) घडली आहे.


केज तालुक्यात एका गावातील एक अल्पवयीन मुलीगी बुधवारी (दि.7 जानेवारी) शिकवणीसाठी घराबाहेर पडली. शिकवणीसाठी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचे कारमधून अपहरण करून तिला डोंगर भागात नेवून निर्मणुष्य ठिकाणी तिच्यावर अत्याचार केल्याची घटन उघडकीस आल्याने जिल्हाभरत एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील एका गावातील साडे पंधरा वर्षाची अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे केज येथे शिकवणीसाठी येत होती. या मुलीची धीरज सांजुरे नावाच्या तरुणाशी पूर्वी ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने आरोपीने तिच्याशी संपर्क वाढवला असल्याची माहिती समोर आली आहे.


घटनेच्या एक दिवस आधी, दि.6 जानेवारी रोजी आरोपीने अल्पवयीन मुलीला फिरायला जाण्याचे अमिष दाखवले होते. त्यानंतर 7 जानेवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 9:30 वाजण्याच्या सुमारास पिडिता शिकवणीसाठी केजे येथे आली असता आरोपीने तिला कारमध्ये बसवले. सुरुवातील तिला नेहमीच्या मार्गावर नेले जात असलचा भास निर्माण केला. त्यानंतर आरोपीने कराची दिशा बदलून केज येथून थेट धारूर तालुक्यातील अंबाचोंडी परिसरातील डोंगराळ भागात नेले हा भाग निर्जन असल्याचा फायदा घेत आरोपीने तेथे कार थांबवली. आजूबाजूला कोणीही नसल्याची खात्री करून तिच्यावर अत्याचार केला.


पिडितेने घरी आल्यानंतर घडला प्रकार पालकांना सांगितला. पिडितेच्या पालकांनी तातडीने केज पोलिस ठाणे गाठून घटनेची सविस्तर माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी प्राथमिक माहितीवरून आरोपी धीरज सांजुरे याच्या विरोधात केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून केज पोलिस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

Comments


bottom of page