top of page

बीडमध्ये एसीबीची मोठी कारवाई; तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात

बीड: बीडमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागने शुक्रवारी (दि.20) मोठी कारवाई केली आहे. शेतकर्‍याकडून लाच घेताना तहसीलदारास एसीबीने रंगहाथ पकडलं आहे. शेतकर्‍याकडून सोलंसी (ऐपत) प्रमाणपत्रासाठी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करत पैकी 20 हजार रुपये लाच घेतान परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना सापळा रचून रंगेहाथ पकडल्याने जिल्हाच्या महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे.


बीडच्या परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी सोलंसी साठी शेतकरी अर्जदाराकडून 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. दरम्यान, तडजोडी अंती 20 रुपयांमध्ये सौदा ठरला होता. तक्रारदाराने बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.


प्राप्त तक्रारीनुसार पथकाने पडताळणी करून सापळा रचला, ठरल्या प्रमाणे लाचेची रक्कम 20 हजार रुपये देण्याचे तारीख ठरली. त्यानुसार आज तक्रारदार लाचेची रक्कम घेवून तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्याकडे गले. तक्रादाराची संशयास्पद हालचाल पाहून लाचेची रक्कम स्विकारण्यास तहसीलदार मुंडे यांनी टाळाटाळ केल्याची माहिती आहे. मात्र, एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून तहसीलदार व्यंकटेश मुंडे यास ताब्यात घेतले.


दरम्यान, एसीबीने आवश्यक पुरावे संकलित करत पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेमुळे परळी तालुक्यासह जिल्ह्याच्या महसूल विभागात खळबळ उडाली आहे. जिल्हाभरात एसीबीच्या कारवाईची जोरदार चर्चा सुरू असून संबंधित अधिकार्‍याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास बीड एसीबीकडून केला जात आहे. भ्रष्टाचाराविरोधातील या कारवाईमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात असून प्रशासनातील पारदर्शकतेसाठी अशा कठोर कारवाया आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Comments


bottom of page