बीडमध्ये साडेपाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार
- Navnath Yewale
- Nov 24
- 2 min read
नराधमाविरोधात शिरुर पोलिसात गुन्हा, बदनामीपाई आरोपीच्या बचावासाठी काही ग्रामस्थांची धडपड

बीड : नाशिकमधील मालेगाच्या डोंगराळा आणि नांदेड शहरातील चिमुकल्यांवरील अत्याचार आणि खूनाच्या घटना ताज्या अतसनाच आता बीडच्या शिरुर कासार तालुक्यातून पुन्हा एक चिमुकलीवर अत्याचाराची महाराष्ट्र हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका साडेपाच वर्षाच्या चिमुकलीवर तिच्या नात्यातीलच एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याही पेक्षा धक्कादायक बाब म्हणजे या नराधमाला प्रकरणातून वाचवण्यासाठी अख्खा गाव एकवला होता. तसेच मुलीच्या आईवर देखील प्रकरण दाबण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बीडमध्ये एका साडेपाच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नात्यातीलच मुलाने अत्याचार केल्याने मोठी खळबळ उडली आहे. दरम्यान, 11 नोव्हेंबर रोजी ही अत्याचाराची अमानुष घटना घडली. या घटनेनंतर पीडित चिमुकलीला असाह्य वेदना होत असतानाही काही ग्रामस्थांनी गावची बदनामी नको यासाठी पीडित कुटुंबाला उपचारासाठी बीड येथे जाऊ दिले नाही. चार दिवस चिमुकली त्रास सहन करत होती.
अखेर मुलीच्या नात्यातील काही व्यक्तींना ही घटना समजली. त्यांनी थेट पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत शिरुर कासार पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून घेतला. पीडित मुलीवर बीडच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. चार दिवस घरात वेदना असाह्य झाल्यानंतर अखेर मुलीच्या आईने उपचारासाठी गाठले आणि सध्या पीडित चिमुकलीवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, नात्यातीलच एका नराधमाने हे दुष्कृत्य केल्यामुळे बदनामी नको म्हणून पीडित कुटुंबालाच गावकर्याकडून धमकी देण्यात येत होती. या संपूर्ण संतापजनक घटनेची आपबीती सांगत असताना पीडित मुलीच्या आईला अश्रू अनावर झाले. या नराधमावर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी गावातील काही लोकांनी पीडित मुलीच्या आईवर प्रचंड दबाव आणल्याचा आरोप आहे. बदनामीच्या भीतीने काही ग्रामस्थांनी चक्क बैठका घेऊन गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पीडित मुलीला तब्बल चार दिवस उपचारासाठी रुग्णालयात जाऊ दिले नाही, असा संतापजनक प्रकार प्राथमिक तपासात उघड झाला आहे. पीडित मुलीची आई, आजी आणि पती रोज पोलिसांकडे जात होते मात्र , पोलिसांनी दखल घेतली नाही. त्यामुळे शिरुर पोलिसह कारवाईस पात्र असल्याचे बालकल्याण समितीचे सदस्य तत्वशील कांबळे यांनी केली आहे.



Comments