top of page

बुलढाण्यात आमदार पुत्रासह एकावर गुन्हा दाखल

बोगस मतदारास पळून लावले; कुणाल गायकवाड, श्रीकांत गायकवाड यांच्यावर शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

ree

बुलढाणा: येथील शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड आणि नातेवाईक श्रीकांत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. स्थानिक नागरिकांनी पकडलेल्या बोगस मतदाराला पोलिसांच्या तावडीतून पळवून लावण्यास मतद केल्या प्रकरणी कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिली आहे.


बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड व नातेवाईक श्रीकांत गायकवाड यांच्यावर बुलढाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोस मतदाराला पोलिसांच्या ताब्यातून पळवून लावण्यास कुणाल गायकवाड मतद करत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या प्रकराची राज्यभर चर्चा सुरू झाली होती. अखेर कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आज सकाळी शासकीय तांत्रिक संस्था येथील मतदान केंद्रावरुन पोलिस आमलदाराच्या ताब्यातून एका बोगस मतदाराला पळवून नेण्यास मतद करणे व शासकीय कामात अडथळा निर्माण करणे या कारणासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड या दोघांवर कलम 132,49,351-2-3-5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यमान आमदार पुत्रासह नातेवाईकावार गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.


दरम्यान, घटना घडली त्या मतदान केंद्रावर काही कार्यकर्त्यांनी एका बोगस मतदाराला पकडून चोप दिला. त्याचवेळी त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. मात्र, तात्काळ आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड आपल्या सहकार्‍यांसह त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या मतदाराला पळवून लावण्यास मदत केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिली.

शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रवी राठोड म्हणाले की, बुलढाणा शहरात शासकीय तंत्रनिकेतन येथे एक बोगस मतदार पळून जात असताना काही लोकांनी पकडला होता. पोलिसांनी तिथं पडताळणी करायला जात असताना इतर दोघांनी शासकीय कामात अडथळा केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानं गुन्हा दाखल झाला आहे.


बुलढाणा शहरात नगरपरपालिकेचे मतदान सुरू असताना गांधी विद्यालया जिजामातानगर तीन बोगस मतदार असल्याबाबत तिथल्या मतदान केंद्राधिकार्‍यांकडून तक्रार प्राप्त झाली. त्यावरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस मतदान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही पोलीस निरिक्षक रवी राठोड म्हणाले.

Comments


bottom of page