बोगस आयएएस पूजा खेडकर कुटुंब पुन्हा वादात; अपहरण झालेल्या ट्रकचा हेल्पर खेडकरांच्या पुण्यातील घरात सापडला
- Navnath Yewale
- Sep 14
- 2 min read

वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांचे कुटुंब पुन्हा चर्चेत आले आहे. नवी मुंबईतून अपहरण झालेला ट्रकचा हेल्पर खेडकर यांच्या पुण्यातील घरात सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, अपहरण झालेला हेल्पर खेडकर कुटुंबाच्या घरात कसा पोहोचला? या व्यक्तीचा खेडकर कुटुंबाशी काय संबंध? या सर्व घटनांची चौकशी नवी मुंबई पोलिसांनी सुरू केला आहे.
आयएएस पूजा खेडकर यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून झालेली नियुक्ती वादात सापडली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे ही नियुक्ती झाल्याचा ठपका आहे. हा वाद देशभर गाजला. यानंतर खेडकर कुटुंब आणि त्यांच्याभोवती असलेले वाद नेहमीच चर्चेत राहिले. आता पुन्हा खेडकर कुटुंब वेगळ्याच घटनेने चर्चेत आले आहे. नवी मुंबई पोलिस झालेल्या घटनेशी बारकाईने तपास करत असल्याने खेडकर कुटुंबियांची भूमिका चर्चेत आली आहे.
मुलुंंड ते ऐरोली मार्गावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि एमएच 12 आरपी 5000 क्रमांकाच्या कारचा शनिवारी सायंकाळी अपघात झाला. ट्रकचालक चंदकुमार चव्हाण आणि त्याचा हेल्पर प्रल्हाद कुमार हे दोघे ट्रकमध्ये होते कारमध्ये दोन व्यक्ती होत्या. अपघातानंतर दोन्ही बाजूने वाद झाला. ट्रकमधील हेल्पर प्रल्हाद कुमार याला कारमधील दोघज्ञंनी जबरदस्तीने त्यांच्यासोबत बसून घेतले.
यानंतर कारमागे ट्रक आणण्याच्या सूचना ट्रक चालक चंदकुमार याला केल्या. ट्रक चालक कारमागे ट्रक घेऊन चालला होता. पण पुढे काही वेळाने कार ट्रक चालकाच्या नजरेआड झाली. या प्रकाराने गोंधळलेल्या ट्रक चालक चंदकुमार याने मालक विलास ढेंगरे यांनी नवी मुंबईच्या रबाळे पोलिस ठाण्यात धाव घेत अपहरणाची तक्रार दिली.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ तपास सुरू केला. कारचा एमएच 12 आरपी 5000 शोध घेतला. ही कार पुण्यात पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या घरी उभी असल्याची माहिती मिळाली. नवी मुंबई पोलिसांचे पथक कारवाई करत तिथं पोचले. तेव्हा पूजा खेडकर यांच्या आईने घराचे प्रवेशद्वार उघडण्यास नकार दिला. पोलिसांनी मात्र कारवाई सुरूच ठेवली. यानंतर खेडकर कुटुंबांच्या घरातून ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमार समोर आला. त्याची पोलिसांनी सुटका केली.
नवी मुंबईतून अपहरण झालेल्या ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमार खेडकर कुटुंबांच्या घरी कसा पोहोचला या प्रश्नाबरोबर अनेक गंभीर मुद्दे या घटनेमुळे खेडकर कुटुंबाभोवती उपस्थित झाले आहेत. अपघातामधील कार कशी ताब्यात आली? कार चालवणारे दोघे कोण होते? खेडकर कुटुंबांशी त्याचा काय संबंध? या घटनेची खेडकर कुटुंबांचे काय कनेक्शन? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे खेडकर कुटुंबाभोवती नवी मुंबई पोलिसांनी उभे केले आहे.
खेडकर कुटुंब वगेवेगळ्या अडणीने राज्यभर चर्चेत आहेत. आता पुन्हा एकदा अपहरण प्रकरण समोर आल्याने खेडरकर कुटुंबाची या प्रकरणात नेमकी काय भूमिका आहे, याचा नवी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणामुळ—— वादग्रस्त खेडकर कुटुंबांच्या पुन्हा अडचणी वाढण्याची शक्यता आहे.



Comments