top of page

भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून जीवित्वास धोका, वकिल असीम सरोदेच्या खुलाश्याने खळबळ

ree

पुणे: राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा दाखला देत वकील असीम सरोदे यांनी धक्कादायक आणि खळबळजन खुलासा केला आहे. भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून जीवाला धोका असल्याचे म्हणाले आहेत. वकील असीम सरोदे यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.


बीड जिल्हा मागील काही दिवसांपासून कायम चर्चेत राहीला आहे. राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावर नुकताच प्राणघातक हल्ल्याची घटना समोर आली आहे. राम खाडे यांनी सुरेश धस यांचे 1000 कोटींची जमीन हडपल्याचे प्रकरण काढले. हे प्रकरण माझ्याकडे होतं मी काही दिवसांपूर्वीच राम खाडे यांना काळजी घ्या असे सांगितले होते. त्यानंतर राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. सुरेश धस यांच्याकडून माझ्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक खुलासा वकिल असीम सरोदे यांनी केला आहे. 1000 कोटींची जमीन हडपल्याचे सुरेश धसांचे प्रकरण राम खाडे यांनी काढले होते. त्यामुळे सुरेश धस यांच्याकडून राम खाडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. राम खाडे यांच्यावर सध्या पुण्यात उपचार सुरू असून त्यांची तब्येत नाजूक आहे. या प्रकरणात असीम सरोदे यांनी केलेल्या खुलाशानंतर खळबळ उडाली आहे.


असीम सरोदे म्हणाले की, काही हजारो एक्कर जमीन सुरेश धस यांच्या पुढाकरातून ती देवस्थानची जमीन असते. सुरेश धस यांनी पुढाकार घेऊन आण स्वत:च्या पदाचा वापर करून देवस्थानांच्या अनेक जमीनी खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे वळून घेतल्या. त्याच्यावर प्लॉट पाडले आणि ते प्लॉट विकले सुद्धा. असा एक खूप मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे. असं एक राम खाडे यांचे म्हणणे होते.


राम खाडे यांनी माहितीच्या अधिकारात याबद्दलची बरीच मोठी माहिती काढली होती. बीडमधील हे सर्व प्रकरण आहे. मुख्यत: देवस्थानाच्या जमीनी हडप करणे ते देखील भाजपच्या एका आमदाराने हे फार गंभीर प्रकरण म्हणून पुढे आलेले होते. त्यावेळी पोलिसाकंडे तक्रारी करूनही ते दखल घेत नसल्याने राम खाडे यांच्या मार्फत आम्ही मुंबईच्या ईडी ऑफिसमध्ये तक्रार केली होती. त्याच्यासोबत माझ्या माहितीप्रमाणे एक दोनसे ते तीनसे कागदपत्रे लावली होती.


पुढे बोलताना असीम सरोदे म्हणाले की, धडधडीत पुरावा दिसत होता की, 1000 कोटींच्या वर जमीनींवर घोटाळा सुरेश धस यांनी केला आहे. आता सुरेश धस यांच्याकडून माझ्याही जीवाला धोका असल्याचे असीम सरोदे यांनी म्हटलं आहे. आता देवस्थानांची जमीन हडप करण्याच्या प्रकरणामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत अत्यंत मोठी वाढ झाल्याचे दिसंत आहे. भाजपकडून या प्रकरणात काय भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .

Comments


bottom of page