भाजप कोणार्कचा हायहोल्टेज ड्राम, भिवंडीत 44 जणांना अटक 470 जणांवर गुन्हा दाखल
- Navnath Yewale
- Jan 19
- 2 min read

भिवंडी: भिवंडी महापालिकेतील कोणार्क विकास आघाडीचे विजय उमेदवार आणि माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात माजी महापौर प्रतिभा पाटील जखखमी झाल्या आहेत. जखमी प्रतिभा पाटील यांना उपचारासाठी रुग्णानलयात दाखल करण्यात आले आहे. हल्ला करणारे आमदार महेश चौघुलेंच्या मुलाचे समर्थक असल्याचा आरोप होत आहे. या हल्ल्यामुळे विलास पाटलांच्या समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या मांडला. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची माहिती समोर येत आहे. भाजप कोणार्क राड्या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दोन्ही गटातील 44 जणांना अटक करण्यात आली आहे. 470 अनोळखी अज्ञातावर गुन्हादाखल करण्यात आला आहे. तसेच दोन्ही गटातील 16-16 कार्यकर्त्यांनी एफआयआर मध्ये नावे आहेत.
दरम्यान, रविवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास माजी महापौर विलास पाटील यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. त्यांनतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही गटांमध्ये जोरदार दगडफेक झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. या घटनेनंतर पोलिसांनी पहाटेच कारवाई केली आणि विलास पाटील यांच्या बंगल्यावर उपस्थित असलेल्या 36 जणांना ताब्यात घेतले. तसेच आमदार महेश चौघुले यांच्या गटातील आठ जणांनाही ताब्यात घेऊन संध्याकाळी भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. यावेळी न्यायालयात पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने न्यायालयात छावणीचे स्वरूप निर्माण झाले होते.
रात्रीच्या वेळी झालेल्या या पोलिस कारवाई नंतर आमदार महेश चौघुले गटा कडून विलास पाटील गटावर चार गुन्हे दाखल करण्यात आले. तर माजी महापौर विलास पाटील यांनी महेश चौघुले यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल केले आहेत. परस्पर गुन्ह्यात दोन्ही गटाकडून जवळ-जवळ 470 अनोळखी लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. मात्र या प्रकरणी दोन्ही गटातील 16-16 आरोपीची नावे दाखल एफआयआर मध्ये दाखल केलेली आहेत .
दरम्यान, पोलिसांनी न्यायालयात हजर केलेल्या विलास पाटील गटातील 36 आरोपीपैकी एकाही आरोपीचे नाव पोलिसानी दाखल केलेल्या एफआयआर मध्ये नाही. निव्वळ संशयावरून त्यांना कोर्टात हजर केले होते. तसेच विलास पाटील यांच्या समर्थकांवर चाकूने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले असताना देखील त्याचे कोणते ही वैद्यकीय प्रमाणपत्र पोलिसांनी कोर्टात सादर केले नाही तसेच याप्रकरणी पोलिसांनी एकतर्फी भूमिका बजावली आहे. या प्रकरणी निपक्ष्यपाती तपास करण्यात यावा, तसेच वकील संघटने कडून जॉईंट सीपी कडे मागणी करण्यात आली आहे की सदरचा तपास भिवंडी गुन्हे शाखेकडे देण्यात यावा. अशी माहिती विलास पाटील यांचे वकील नारायण आयर यांनी दिली आहे.



Comments