भाजप- शिंदेसेनेत राडा: शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण, भाजपच्या माजी नगरसेवकावर आरोप
- Navnath Yewale
- Nov 21
- 2 min read
एकनाथ शिंदे आधीच नाराज, त्यातच वादाची ठिणगी

ठाणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेवून भाजप राजच्याच्या वरिष्ठ नेतृत्वाची तक्रार केल्याचे बोलले जात आहे. शिंदेसेनेतील पदाधिकार्यांच्या पक्षप्रवेशावरून थेट मंत्र्यांची नाराजी समोर आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठून भाजपच्या नेतृत्वाबाबत तक्रार केल्याचे समोर आले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवरून हा वाद निर्माण झालेला असतानाच आता ठाण्यातून या वादाला फुंकर मिळाल्याची घटना समोर आली आहे.
मागील काही दिवसांपासून महायुतीत भाजपा आणि शिंदेसेना यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. ठाण्यात भाजपा आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याने हा वाद आणखीच विकोपाला जाण्याची शक्यता आहे. भाजपाच्या माजी नगासेवकांनी त्याच्या कार्यकर्त्यांसह शिंदेसेनेच्या पदाधिकार्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. याबाबत नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे ठाण्यात भाजपा आणि शिंदेसेना यांच्यातील वाद आणखी चिघळणार असल्याचं बोललं जात आहे.
भाजपाच्या माजी नगरसेवकाकडून शिंदेसेनेच्या हरेश महाडिक आणि महेश लहाने या पदाधिकार्यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. माजी नगरसेवक नारायण पवार यांच्याकडून ही मारहाण झाल्याचा आरोप आहे. ठाण्यात बीएसयूपी प्रकल्पातील सदनिकाधारकांना मुद्रांक शुल्क व नोंदणीसाठी लागणारा 50 हजार ते एक लाखाचा खर्च माफ करून केवळ 100 रुपये करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या निर्णयावरुन भाजपा आणि शिंदेसेनेत श्रेयवादाची लढाई सुरू झाली. एकनाथ शिंदेमुळे हा निर्णय झाल्याचं सांगत शिंदेसेनेचे कार्यकर्ते बीएसयूपी इमारतीच्या बाहेर जल्लोष करत होते. तिथून व्हिडिओ कॉल करून लोकांचं थेट बोलणं एकनाथ शिंदेंशी करून देत होते. पाचपाखाडी येथील लक्ष्मीनगर सोसायटीजवळ शिंदेचे पदाधिाकरी हरेश महाडिक आणि महेश लहाने शिंदेसैनिकांसोबत पेढे वाटून जल्लोष करत होते त्याचवेळी तिथे भाजपाचे माजी नगसेवक नारायण पवार कार्यकर्त्यांसह तिथे पोहचले.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यात अलीकडच्या काळात शिंदेसेना- भाजपा यांच्यातील वाद वाढला आहे. एकीकडे नवी मुंबईतील गणेश नाईक यांनी शिंदेंना थेट अव्हान दिले आहे तर दुसरीकडे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण-डोबिवलीत एकनाथ शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिंदेसेनेचे बरेच माजी नगरसेवक भाजपात घेतल्याने एकनाथ शिंदे नाराज आहेत. या नाराजीचे पडसाद राज्याच्या कॅबिनेट बैठकीत उमटले. त्यानंतर दुसर्याच दिवशी शिंदेंनी गाठत रवींद्र चव्हाण यांची तक्रार केल्याचे समोर आले. एकीकडे हा वाद कमी होत नसताना ठाण्यात भाजपाच्या माजी नगरसेवकाकडून शिंदेसैनिकांना झालेल्या मारहाणीमुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.



Comments