भाजपच्या सुडाचा कोकणात बदला?; आमदार निलेश राणे मध्यरात्रीच मालवण पोलिस ठाण्यात!
- Navnath Yewale
- Dec 2
- 2 min read
भाजपच्या देवगड तालुकाध्यक्षाच्या गाडीत अढळली रोकड; आमदार निलेश राणेंनी तडजोड उधळून लावल्याचा दावा

मालवण: कोकणात भाजप आणि शिवसेना (शिंदे) गटात संघर्ष पेटल्याचे पहायला मिळत आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात प्रकर्षाने दिसून येत आहे. मालवणमध्ये भाजप पदाधिकार्याच्या बेडरुमध्ये अचानक धाड टाकून लाखो रुपयांची रोकड पकडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आमदार निलेश राणे यांची ‘पक्षाला हिरा’ मिळाला अशी प्रशंसा केली. त्यानंतर मतदानाला आवघे काही तास शिल्लक असताना मंगळवारी (दि.1) मध्यरात्री 1:00 सुमाराच निलेश राणे यांनी थेट मालवण पोलिस ठाणे गाठल्याने खळबळ उडाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेना (शिंदे) गटात संघर्ष विकोपाला गेल्याचे पहावयास मिळत आहे. पश्मिम महाराष्ट्रात सोलापूरच्या सांगोल्यात माजी आमदार शहाजी बापू पाटील, मराठवाड्यात हिंगोलीमध्ये संतोष बांगर असो की कोकणात सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये निलेश राणे असो. प्रत्यक्षा या संघर्षात भाजपने जसे शहाजी बापू, संतोष बांगर यांना टारगेट केले. याचा बदला आमदार निलेश राणे यांनी थेट भाजप पदाधिकार्याच्या बेडरुमध्ये धाड टाकत 25 लाखावर रोकड जप्त करून घेतला असंच काहीसं चित्र निर्माण झालं.
दरम्यान, मागील आठवड्यात आमदार निलेश राणे यांनी भाजप पदाधिकार्याच्या बेडरुममध्ये अचानक धाड टाकून जवळपास 25 लाख रुपयांची रोकड पकडून दिल्याने राज्यभरात खळबळ उडाली. निलेश राणे यांच्या कारवाईची प्रशंसा करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला कोकणात ‘हिरा’ मिळाल्याचे दावा करत निलेश राणेंची प्रशंसा केली.
मालवण नगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला अवघे काही तास शिल्लक असताना मंगळवारी (दि.1) रात्री पिंपळपार येथे 12:15 सुमारास निवडणूक पथकाच्या तपासणीमध्ये विना नंबरच्या कारमध्ये 1.50 लाखाखी रोकड मालवण पोलिसांना मिळून आली. पोलिसांनी संबंधीत वाहन ताब्यात घेतलं असता कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांना फोनवरुन घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच आमदार निलेश राणे यांनी रात्री 1:15 च्या सुमारास तडकाफडकी मालवण पोलिस गाठले.
तपासणीमध्ये अढळून आलेली विना नंबरची कार ही भजापचे देवगड तालुकाध्य महेश नारकर यांची आहे, कारवाईच्या वेळी संबंधीत पदाधिकारी कारमध्ये होते.
पोलिस आणि पदाधिकार्यांमध्ये कार सोडण्या बाबत बोलणं झाल्याचंही निलेश राणे यावेळी म्हणाले. कारमध्ये किती रोकड होती हे पथकांनाच माहिती, आता ही रक्कम कमी सुद्धा दाखवतील असा आरोपही निलेश राणे यांनी केला.
दरम्यान, निलेश राणे यांच्या कारवायाने भाजपला मोठा हादरा बसला आहे. माजी आमदार शहाजी बापू पाटील व आमदार संतोष बांगर यांनी भाजप सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप केला असला तरी कोकणात मात्र निलेश राणे यांनी कायद्यावर बोट ठेवूनच याचा बदला घेतल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.



Comments