भारत- अमेरिकेत पुन्हा तनाव; व्हेनेझुएलानंतर आता ट्रम्प यांचा भारताला इशारा
- Navnath Yewale
- 4 days ago
- 2 min read

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. व्हेनेझुएलाच्या कारवाईनंतर चर्चेत आलेल्या ट्रम्प यांनी व्यापार आघाडीवर भारताला थेट इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, जर भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे सुरू ठेवले तर त्यावर कर आणखी वाढवता येऊ शकतात. ट्रम्प यांनी वैयक्तिकरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी योचे कौतुक केले, त्यांना “ चांगला माणूस’ म्हटले. परंतु राष्ट्रीय हितसंबंध आणि व्यापार धोरणांच्या बाबतीत ते कोणतीही सवलत देणार नाहीत, असे त्यांनी सूचित केले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, भारताचा रशियासोबतचा तेल व्यापार हा अमेरिकेसाठी चिंतेचा विषय आहे. ते म्हणाले की पंतप्रधान मोदींना माहित आहे की, ते या करारावर नाराज आहेत. ट्रम्प यांनी इशारा दिला की, जर भारताने रशियाकडून तेल आयात कमी केली नाही तर लवकरच भारतावरील कर वाढवले जातील. ट्रम्प यांच्या या धोरणाकडे भारताला रशियापासून दूर करण्याचा आणि अमेरिकन उर्जा बाजारपेठेकडे वळणवण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.
ट्रम्प प्रशासनाने ऑगस्ट 2025 मध्ये भारतावर 50 टक्के मोठ्या प्रमाणात कर लादला होता. या वादाचे मुख्य कारण म्हणजे ट्रम्प यांना भारताने आपले दुग्धजन्य पदार्थ आणि कृषी क्षेत्रे अमेरिकन कंपन्यांनसाठी पूर्णपणे खुली करावीत असे वाटते. दुसरीकडे, भारत आपल्या देशांतर्गत अर्थव्यवस्थेचे आणि शेतकर्याच्या हिताचे रक्षण करण्याच्या निर्णयावर ठाम आहे. या व्यापार संघर्षामुळे दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळ चाललेला व्यापार करारही अडचणीत आला आहे.
दरम्यान ट्रम्प यांच्या अलिकडील इशार्यामुळे भारत- अमेरिकेच्या राजनैतिक वर्तुळात तणाव वाढला आहे. ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा रशिया भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार राहिला आहे. अमेरिकन प्रशासनाचा असा विश्वास आहे की, स्वस्त रशियन तेलाद्वारे भारत आपल्या अर्थव्यवस्थेला फायदा मिळवून देत आहे, जे अमेरिकेच्या भू-राजकीय हिताच्या विरुद्ध आहे. ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील वैयक्तिक मैत्रीची अनेकदा चर्चा हेत असताना, व्यापार युद्ध आणि कर यासारख्या मुद्यांवरून या मैत्रीची परीक्षा सुरू झाली आहे. अमेरिकेच्या दबावासोबत भारत आपली धोरणात्मक स्वायत्तता कशी संतलित कतो, हे पाहणे महत्वाचे आहे.



Comments