भारतीय पासपोर्टची ताकद वाढली! आंतरराष्ट्रीय प्रवास सोपा होणार 55 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
- Navnath Yewale
- 12 hours ago
- 1 min read

नवी दिल्ली: हन्ले पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार, जागतिक स्तरावर पासपोर्टच्या शक्तीमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत. या वर्षी आशियाई देशांचे वर्चस्व कायम आहे. सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली राहिला आहे, जो 192 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवास करण्याची परवानगी देतो. त्यानंतर जपान आणि दक्षिण कोरिया (188 देशांसह) आहेत. संयुक्त अरब अमिराती या वर्षी विशेषत: प्रमुख आहे. पाचव्या स्थानावर पोहोचले आहे.
भारताच्या पासपोर्ट रँकिंगमध्येही सुधारणा झाली आहे. भारताने पाच स्थानांनी प्रगती करत अल्जेरियाशी बरोबरी करत 80 व्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय नागरिक आता 55 देशांमध्ये पूर्व व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. यामध्ये व्हिसा- मुक्त, व्हिसा -ऑन- अरायव्हल आणि इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन सुविधांचा समावेश आहे. गेल्या वर्षी भारत 85 व्या स्थानावर होता.
या वाढीव लवचिकतेमुळे अशिया, अफ्रिका, ओशिनिया, कॅरिबियन आणि मध्य पुर्वेतील अनेक भागांमध्ये जाणार्या भारतीय प्रवाशांना फायदा होईल. लोकप्रिय व्हिसा- मुक्त देशांमध्ये थायलंड, मलशिया, मॉरिशस, नेपाळ, बार्बाडोस, फिजी, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स यासह इतर समाविष्ट आहेत. व्हिसा- ऑन-अरायव्हल किंवा इटीए,देशामंध्ये इंडोनेशिया मालदीव, श्रीलंका, केनिया, जॉर्डन आणि फिलीपिन्स यांचा समावेश आहे. एकंदरीत या अहवालातून हे स्पष्ट होते की भाराताचा पासपोर्टची ताकद हळूहळू वाढत आहे. भविष्यात भारतीयांसाठी आंतरराष्ट्रीय प्रवास सोपा होऊ शकतो



Comments