इरणाच्या एका निर्णयाने जगाची झोप उडाली!
- Navnath Yewale
- 5 hours ago
- 1 min read

अमेरिका आणि इराणच्या युद्धात जग तणावात आहे. जगावर मोठं संकट आलं आहे. मात्र, तरीही हे युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. इराणकडून इतरही देशांचे तेल जहाज उडवले जात आहेत. गॅस आणि तेलाचे संकट सर्वच देशांवर आहे. इराणवर हल्ला करून अमेरिकेलाही फटका बसलाच. इराण आणि अमेरिका युद्ध आता हळूहळू समुंद्राकडे पोहोचले आहे.
इराणकडून अमेरिकेवर दबाव आणण्याकरिता महत्वाचा समुद्र मार्गही बंद करण्यात आला. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचा ताबा आहे. ज्यामुळे आता थेट तेल आणि वायूच्या किंमती वाढल्या असून वाहतूक ठप्प आहे. तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत. इराण अजून मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून जर इराणकडून हा निर्णय घेण्यात आलाच तर इराण सागरी ऑपरेशन दुसर्या महत्वाच्या जलमार्गांकडे वळवेल.
इराणच्या या इशार्याने जगाची झोप उडवली आहे. इराण अधिकार्याने जल जझीरासोबत बोलताना म्हटले की, अमेरिकेने चुकीचे पाऊल उचलले तर होर्मुजच्या सामुद्रधुनीत दुसरा संघर्ष निर्माण होऊ शकतो. लवकरच एका मोठ्या प्रादेशिक युद्धात रुपांतरित होऊ शकते आणि इराणकडे अजूनही बरेच पत्ते शिल्लक आहेत. अजूनही होर्मुजचा सागरीमार्ग बंद पडलेला आहे.
बाब अल- मंडेबल इराणचे दुसरे होर्मुझ मानले जाते. इराणकडून जर तो समुद्री मार्ग बंद करण्यात आला तर जागाच्या हातात काहीच शिल्लक राहणार नाही. अंदाजे 26 किलोमिटर रुंदीचा हा जलमार्ग येमेन आणि जिबूती दरम्यान आहे. लाल समुद्राच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वारावर आहे. जर तो बंद झाला तर आखाती तेल उत्पादक देशांना तेल निर्यात करण्यासाठीच शेवटचाही मार्ग बंद होऊ शकतो.
आता होर्मुज सामुद्रधुनी बंद असल्याने बाब अल-मंदेब आखाती देशांसाठी आणखी महत्वाचा बनले आहे. सौदी अरेबिया सध्या लाल समुद्रातील बंदरे आणि पूर्व- पश्चिम पाईपलाईनद्वारे काही तेल निर्यात सुरू ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. बहुतेक तेल आशियाई बाजारपेठांसाठी निर्यात केले जाते आणि येमेनमधून जाते. इराणकडून हा समुद्रीमार्ग बंद करण्यात आला तर मोठी खळबळ उडेल.



Comments