top of page

इराणचा अमेरिकेवर मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली

Mar 13
1 min read

इराण आणि अमेरिकेतील युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. अनेक देशांनी हे युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. मात्र दोन्ही बाजूंनी सतत हल्ले सुरू आहेत. इराण सतत अमेरिकन ठिकाणांना लक्ष्य करत आहे. आता इराणकडून अमेरिकेच्या अणु तळाजवळ मोठा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. इराणने इन्किर्लिक एअर बेस (तुर्किये) वर क्षेपणास्त्र डागले आहे. माहिती समोर आली आहे. तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याची पुष्टी केली असून या संदर्भात इराणशी संपर्क सुरू असल्याचेही सांगितले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार इराणने अमेरिकेच्या तुर्कीमधील अणु तळावर हल्ला केला आहे. त्याचबरोबर अमेरिकन विमानवाहू नौकेवरही हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. इस्लामिक रिवॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सने असा दावा केला आहे की, त्यांनी यूएसएस अब्राहम लिंकनवर हल्ला केला आहे. गल्फ ऑफ ओमानमध्ये हा हल्ला झाल्याचे इराणकडून सांगण्यात आले आहे. आयआरजीसी च्या मते हल्ल्यानंतर अब्राहम लिंकन मागे हाटले आहे, मात्र अमेरिकेने हा हल्ला झाल्याचे नाकारले आहे.

नाटोच्या ठिकाणांवर हल्ले : इराणने एकाच वेळी तीन नाटो ठिकाणांना लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. दुबईवरही मोठा हल्ला झाल्याचा दावा केला जात आहे. इराणच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची एअर डिफेन्स प्रणाली युरोपमधून मध्य- पूर्वेत पाठवण्यात आली आहे. प्रत्यूत्तरादाखल कारवाईत इराणची एक बॅलिस्टिक मिसाइल मेडिटेरिनियन समुद्राच्या परिसरात नष्ट करण्यात आली असून नाटो च्या एअर डिफेन्स सिस्टमने ती मिसाइल पाडल्याचे बोलले जात आहे.



नाटोची ही मिसाईल इन्सर्लिक एअरबेसच्या दिशेने जात होती. या तळावर अमेरिकेची टॅक्टिकल अण्वस्त्रे असल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्व भूमध्य समुद्रात नाटो च्या एअर डिफेन्स प्रणालीने ही मिसाइल रोखली. तसेच इराण समर्थित पीएमएफ च्या तळावरही हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच इराकमध्ये अमेरिकेवर लुकास ड्रोनद्वारे हल्ला झाल्याची माहिती आहे.

Comments


bottom of page