top of page

भिवंडी महापालिकेत सत्तानाट्य उफाळले; भाजपचे नगरसेवक फुटले, महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या

भिवंडी: भिवंडीत महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीला वेगळेच वळण मिळाले आहे. महापौरपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपने आपला उमेदवार बदलला आहे. त्यानंतर भाजपमध्ये दोन गट पडल्याने आता भिवंडी महापालिकेत महापौर कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. भाजपने यापूर्वी नारायण चौधरी यांना भाजपच्या महापौरपदाचे अधिकृत उमेदवार घोषित केले होते. नारायण चौधरी यांना भाजपकउून महापौर पदासाठी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. मात्र, महापौरपदाच्या निवडणुकीला वेगळेच वळण लागले असून भाजपने ऐनवेळी महापौरपदाचा उमेदवार बदलला आहे. त्यामुळे भाजप नगरसेवकांतच फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. भाजपचे 9 नगरसेवक फुटल्याचे माहिती आहे.


भाजपचे भिवंडी शहराध्यक्ष रविकांत सावंत यांनी महापौर पदाच्या उमदेवार म्हणून स्नेहा मेहूल पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यासंदर्भातील लेखी पात्र भाजप शहराध्यक्षांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांना दिले. तर, भाजपने आता स्नेहा मुहुल पाटील यांची महापौरपदाचा उमेदवार जाहीर केला होता. मात्र महायुतीतील घटक पक्ष सोबत यायला तयार नव्हते, त्यांच्याशी अनेकवेळा मिटींग केल्या. मात्र घटक पक्ष सोबत येत नाही. त्यातच आज भाजपने स्नेहा मेहुल पाटील यांना महापौरपदाचे उमेदवार घोषित केले. त्यामुळे मी सेक्युलर सोबत जाणार, अशी प्रतिक्रिया नारायण चौधरी यांनी दिली होती. त्यानंतर, ते काँग्रेससोबत गेल्याने भिवंडी महापालिकेत चांगलंच सत्तानाट्य पाहायला मिळालं.


भिवंडती भाजप नगरसेवकांत फूट: भिवंडीतल्या भाजपच्या नगरसेवकांमध्ये फाटाफूट झाली असून भाजपचा एक गट नारायण चौधरींच्या विरोधात गेला आहे. नारायण चौधरी काँग्रेससोबत गेल्यानं भाजपचा एक गट नाराज झाल्याची माहिती आहे. नारायण चौधरी हे भाजपचे अधिकृत महापौरपदाचे उमेदवार तर स्नेहा पाईल ह्या डमी उमेदवार असल्याचा आरोप करत नगरसेवकांमध्ये फूट पडल्याचं दिसून येत आहे. तसेच, नारायण चौधरी यांची काँग्रेससोबत जाण्याची वेळ असल्याने भाजपचे नगरसेवक नाराज आहेत.


भाजपचे 9 नगरसेवक फूटले: भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या महायुतीकडे मिळून 34 नगरसेवक आहेत. बहुमतासाठी त्यांना कोणार्क विकास आघाडी, भिवंडी विकास आघाडी आणि समाजवादी पक्षाच्या मदतीची आवश्यकता आहे. हे सर्व घटक एकत्र आल्यास महायुती बहुमताचा आकडा गाठू शकते. मात्र, महायुतीतही महापौर पदावरुन भाजप आणि शिवसेना यांच्यात मतभेद उफाळून आले आहेत. त्यामुळे आज दोन्ही पक्षांकडून स्वतंत्रपणे महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले जाण्याची शक्यता आहे.


बहुमताचा आकडा 46 महापालिकेत पक्षीय बलाबल

काँग्रेस 30, भाजप 22, राष्ट्रवादी काँग्रेस 12, शिवसेना 12, समाजवादी पक्ष 6, कोणार्क विकास आघाडी 4, भिवंडी विकास आघाडी 3, अपक्ष 1

Comments


bottom of page